मुंबई बडोदा द्रुतगती महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप…

मनोर – प्रास्तवित मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी पालघर तालुक्यात भूसंपादनाचे काम सुरु असून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत.भूसंपादन प्रक्रिये दरम्यान आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्या साखरे गावातील शेतकऱ्यांना बुधवारी (ता.21) पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरसेकर यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

भूसंपादनाचा मोबदला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तसेच काही ठिकाणी दलालांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी पालघरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. नुकताच साखरे आणि पारगाव येथे शेतकऱ्यांना बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले होते.

भूसंपादन प्रक्रियेत आवश्यक दस्तावेज पूर्ण केलेल्या साखरे गावातील सहा शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. भूसंपादनाच्या मोबदल्याचे धनादेश महसूल विभागाकडून घरपोच मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे, दहिसर चे तलाठी नितीन सुर्वे,कोतवाल सुजित वझे आणि शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here