आलेगाव बाभूळगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे…

पातुर – निशांत गवई

गेल्या काही वर्षांपासून आलेगाव बाभूळगाव रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम झाले नसल्यामुळे सदर रस्त्यावर अनेक किरकोळ मोठे अपघात झाले. वाहन चालक व प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला.मोठ्या कालावधी नुसार विविध वृत्तपत्राची दखल घेत संबंधित प्रशासनाने सदर रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू केले.परंतु सुरू असलेले डांबरी करणाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे या कडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

पातूर तालुक्यातील आलेगाव बाभूळगाव हा रस्ता अतिरहृदरीचा असून सदर रस्त्यावरून जवळपास ४८ खेडेगावातील तसेच डोनगाव,मेहकर,खामगाव,कडे जाणारी हजारो वाहने सदर रस्त्यावरून धावत असतात.तसेच आलेगाव मळसुर प्रा आ केंद्राच्या रुग्णवाहिका रुग्णावर उपचार करण्यासाठी अकोला येथे घेऊन जात असतात,गेल्या काही वर्षांपासून सदर रस्त्यावर मोठं,मोठे खड्डे पडून सदर रस्ता जीवघेणा बनला होता.

त्या खडतर रस्त्यामुळे अनेक किरकोळ व गंभीर अपघात सुद्धा घडले.खडतर रस्त्यामुळे रुग्णवाहिकाना रुग्ण अकोला येथे नेतांना खूप वेळ लागायचा त्यामुळे, अनेक रुग्ण दगावल्याची चर्चा सुद्धा नागरिकांमध्ये होती.

अनेक अपघात अनेक रुगणांचे प्राण घेणाऱ्या रस्त्याचे डांबरी करणाचे काम सुरू असून,सदर काम उत्तम क्वालिटीचे होणे आवश्यक असतांना सडकेवर टाकण्यात आलेली गिट्टी कोणत्या प्रकारची वापरली जात आहे,तसेच टाकलेल्या गिट्टी आधी डांबराचा वापर करण्यात आला नसल्याचे स्पस्ट दिसून येत आहे.तरी संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन सदर रस्त्याची पाहणी करून,काम पारदर्शक पद्धतीने कसे होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी व वाहन चालकां कडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here