आलेगाव १०८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचा निष्काळजी पणा, कारवाई ची मागणी…

निशांत गवई

अपघातातील जखमी रुग्ण वेळेवर पोहचवण्यासाठी व त्याचे प्राण वाचवण्यासाठी 108 रुग्णवाहिका प्रसिद्ध आहे पण याला अपवाद आहे आलेगाव येथील 108 रुग्णवाहिका
संबधित रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांचा रुग्णांना सेवा न देण्याचा व वेळेवर रुग्णवाहिका न आणण्याचा,निष्काळजी पणाचा, निर्लल्ज पणाचा कळस गाठला आहे अशीच घटना काल पातूर येथे घडली काल रात्री 9 च्या दरम्यान आगीखेड रस्त्यावर एक अपघात घडला या अपघातातील जखमी ना काही नागरिकांनी पोलीस स्टेशन ला आणले होते.

या नंतर पातूर येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दुले खा यांनी 108 वर फोन केला असता पातूर येथील 108 रुग्णवाहिका प्रसूती चा रुग्ण घेऊन आताच अकोला गेली आहे त्या मुळे आलेगाव ची रुग्णवाहिका अपघातातील रुग्ण घेण्यासाठी येईल असे 108 लाईन वर सांगण्यात आले त्या नंतर सदर रुग्ण पातूर आरोग्य केंद्रात आणण्यात आल्यावर आलेगाव ते पातूर येण्यासाठी अर्धा तासांचा अवधी लागत असताना सुद्धा तब्बल 2 तास झाले तरी आलेगाव येथील रुग्णवाहिका पातूर ला आली नाही त्या मुळे कंटाळून पातूर पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यानी पातूर पोलीस स्टेशन च्या व्हॅन मध्ये अपघातातील रुग्ण अकोला दाखल केला.

आणखी एक घटना संबधित आलेगाव रुग्णवाहिकेसंबंधी म्हणजे काल दुपारी च देऊळगाव येथे मोटर सायकल अपघातात 2 युवक जखमी झाले होते त्या अपघाताची माहिती व रुग्णवाहिकेची मागणी पातूर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन सुरवाडे यांनी केली होती त्यान्च्या फोन वर पातूर 108 रुग्णवाहिका अकोला येथे असल्याने आलेगाव च्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले पण संबधीत रुग्ण देऊळगाव वरून पातूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यावर सुद्धा 2 तास होत.

आले असताना सुद्धा आलेगाव येथून रुग्णवाहिका आली नाही म्हणून सचिन सुरवाडे यांनी परत कॉल केला असता रुग्णवाहिकेवरील कर्मचारी यांनी उडवाउडवी चे उत्तरे देऊन उद्धटपणे बोलणे केले तसेच रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्याने जखमी रुग्णांना खाजगी वाहनाने अकोला येथे नेण्यात आले.एकाच दिवसात आलेगाव 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्याने निर्लजपणाचा कळस गाठला असल्यामुळे संबधित आलेगाव 108 कर्मचर्यानावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here