अकोट | गोमांस वाहून नेणारे तिघे अटकेत…१लाख ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त…

अकोट – संजय आठवले

गुप्त खब-याने दिलेल्या माहितीवरुन आकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे आणि त्यांचे सहकारी पोहेकॉ. ऊमेश सोळंके, नापोका ऊमेश पराये, विजय चव्हाण, सुलतान पठाण, अमोल बहादुरकर, दिलीप तायडे, मनिष कुलट, सागर मोरे, कपील राठौर, विशाल हिवरे यानी शासकिय विश्रामगृह पोपटखेड मार्ग आकोट समोर सापळा रचून गोमांस वाहून नेणारा ऑटो पकडला.

ह्या आटोमधून वसिम खाँ मुर्तुजा खाँ वय २७ गफुरवाला प्लॉट आकोट, अ, शाकीर अ. समद वय३०, शाहरुखखान अजिजखान वय ३० दोघेही राहणार आझाद नगर आकोट हे तिघे ६३ किलो गोमांस वाहून नेत होते.

तिन्ही आरोपीना अटक करण्यात येवून त्यांचेकडील ६३ किलो गोमांस किमत १२,६०० व एक ऑटो किमत १लाख५०हजार असा १लाख६२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन्ही आरोपींच्या विरोधात बन 1273 सुलतान खाँ बिस्मिल्ला खाँ पठाण यानी दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांचेवर अप. क्. १०१/२२ कलम ५, ५क,९अ,प्राणी संरक्षण कायदा १९९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात इला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here