अकोट ग्रामीण पोलिसांनी अवैध गोवंश वाहतूक करणारे वाहन केले जप्त…

पाच गोवांशना जीवदान तर ५ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त…

अकोट ग्रामीण पोलिसांनी अकोट धारणी येथील मार्गावर बेकाद्याशीर गोवंशची वाहतुक करणारे वाहन ग्रामीण पोलीसांनी पकडले आहे. वाहनचालकाविरूद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वाहन चालकासह असे चार जणांना अटक करण्यात आली असून सदर वाहन जप्त करण्यात आले आहे.या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी सकाळी गस्तीवर असताना पहाटेच्या सुमारास अकोट ग्रामीण हद्दीतील अकोट धारानी मार्गे वर अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती पोलीसांनी गुप्त माहीती मिळाल्याच्या आधारावर पोलिसांनी धारणी मार्गावर वरून येणारे वाहन क्रमांक एमएच 30 एबी 0118 या वाहनाची पोलीसांनी चौकशी करून तपासणी केली असता यामध्ये पाच गोवंश अत्यंत निर्दयीपणे गोंबून वाहतूक होत असलेले आढळले.

वाहनातुन सुमारे 5 लाख 70 हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. दरम्यान ग्रामीण पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक ज्ञानोबा फड.यांचे मार्गदर्शनाखाली वाहन व पाच गोवंश वाहतूक करणारे आरोपी रफिक उल्ला खान जबी उल्ला खान (वय 38 वर्ष),शफीउल्ला जबीउल्ला खान (वय 42 वर्ष),सलिमुद्दिन इक्रामोदिन (वय 27वर्ष),

शेख फारुख शेख हारून (वय 33 वर्ष),राहणार सर्व अकोट आपल्या ताब्यातील या वाहनातुन पाच बैल हे अत्यंत दाटी दुटीने कोंबुन भरुन अकोट धारणी येथे कत्तलीसाठी घेवुन जात असतांना आढळुन आल्याने महाराष्ट्र पशु सरंक्षण कायदा व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात येत असून पोलीसांनी वाहन चालकासह वाहन ताब्यात घेतले आहे. या बेकाद्याशीर गोवंश प्राण्यांची वाहतुकीच्या कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर व अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांचा मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here