आकोट पोलीसानी पकडला एक लाखाचा गुटखा…एका आरोपीस अटक दुसरा फरार…

आकोट, संजय आठवले

अंजनगावमार्गे आकोट शहरात आणला जाणारा गुटखा पकडण्यासाठी सापळा रचणा-या आकोट पोलिसानी एक लाखाचा गुटखा पकडला असुन गुटखा वाहून आणणा-या वाहन चालकास अटक करण्यात आली आहे. वाहनातील दुसरा आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

आकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे याना गुप्त खब-याने आकोटात अंजनगाव मार्गाने गुटखा येणार असल्याची खबर दिली. त्यावरुन ठाणेदार अहिरे यानी पोऊनि. चंद्रकांत ठोंबरे, हेड कॉन्स्टेबल ऊमेश सोळंके, विजय चव्हाण, ऊमेश पराये, सागर मोरे, मनिष कुलट, जवरीलाल जाधव यानी ३ फेब्रु. रोजी धारुळ वेस चौकात सापळा रचला. रात्री दहा वाजता अंजनगावकडून पांढ-या रंगाची झायलो क्र. एमएच १५ सीटी २४१० ही गाडी पोलीसानी अडवली. गाडीतील एकजण ऊडी मारुन फरार झाला.

परंतु वाहनचालकाला पोलीसानी अटक केली. गाडीच्या झडतीत ९३ हजार ९५० रुपये किमतीच्या विमल व वाह गुटखा पुड्या आढळून आल्या. या पुड्यांसह झायलो गाडी किमत अडीच लाख रुपये ही सुद्धा जप्त करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीचे नाव सागर संतोष रावणकार असुन त्याचेवर अप.क्र. ९८/२२ भादवी कलम ३२८, १८८, २७२, २७३ सहकलम अन्न सुरक्षा माणके अधिनियम २००६ (२६(१) ४,२७,३), (डीई-३०), (२ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध व पुढिल तपास ठाणेदार प्रकाश अहिरे यांचे मार्गदर्शनात पोऊनि. चंद्रकांत ठोंबरे करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here