आकोट कृ.ऊ.बा.स. प्रशासक मंडळ चौकशीच्या जाळ्यात. माजी आमदार संजय गावंडे व सहकाऱ्यांच्या तक्रारीचा परिणाम.

आकोट, संजय आठवले

आकोट कृऊबासवर सहा महिन्यांपूर्वीच पदारुढ झालेल्या अशासकिय प्रशासक मंडळाच्या गैरकारभारावर शेतकरी पॕनेल नेते तथा माजी आमदार संजय गावंडे व पॕनेलचे अन्य नेते यानी आक्षेप घेवून या संदर्भात चौकशी करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधक अकोला याना केली होती. त्यानुसार त्यानी आकोट कृऊबास प्रशासक मंडळाच्या कारभार चौकशीचा आदेश दिला आहे.

आकोट कृऊबास संचालक मंडळाचा कार्यकाल दि. २२.०४.२०२१ रोजी संपुष्टात आला. त्यामूळे दि. २३.०४.२०२१ ते ०७.१०.२०२१ पर्यंत प्रशासकिय प्रशासकानी कार्यभार वहन केला. त्यानंतर दि. ०७.१०.२०२१ पासून अशासकिय प्रशासकांची कारकिर्द सुरु झाली. राज्य शासनात सामिल असलेल्या भारतिय राष्ट्रिय काँग्रेसकडून दोन, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन, शिवसेनेकडून दोन तर प्रहारकडून चार अशा एकूण दहा जणांची येथे प्रशासकपदी नेमणूक करण्यात आली.

यामध्ये पक्षिय विसंगतीने व अननुभवी लोकांची वर्णी लागल्याने या प्रशासक मंडळाबाबत प्रहार वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच महाविकास आघाडीच्या एकाही घटक पक्षाने आपल्यातर्फे एकाही मागासवर्गीय तथा आदीवासी व्यक्तीला प्रशासक म्हणून घेतले नाही. त्यामूळे महाविकास आघाडीला आदीवासी व मागासवर्गीयांचे वावडे असल्याचा संदेश प्रसृत झाला.

आपल्या बेमूर्वतखोर वर्तनाने महाविकास आघाडीने संपूर्ण आकोट तालुक्यात एकही मागासवर्गीय अथवा आदीवासी कृऊबासचा प्रशासक होण्याचे पात्रतेचा नसल्याचे सिद्ध केलै. ह्या भेदभावाने संपूर्ण तालूक्यातील मागासवर्गीय व आदीवासीयांमध्ये महाविकास आघाडीने आपला अपमान केल्याची भावना निर्माण झाली. पक्षिय असंतोषात ह्या रोषाचीही भर पडली. त्यामूळे सारे असंतुष्ट घटक नव प्रशासकांच्या कारभारावर लक्ष ठेवून होते.

ह्या निरिक्षणातुन प्रशासकांच्या चूका व संस्था अहिताच्या बाबी समोर येताच शेतकरी पनेल तथा सेना नेते माजी आमदार संजय गावंडे, भाजपचे डॉ. गजानन महल्ले, काँग्रेसचे डॉ. प्रमोद चोरे, बद्रुज्जमा, अॅड, मनोज खंडारे, वंचितचे प्रदिप वानखडे, प्रमोद खंडारे यानी जिल्हा उपनिबंधकाकडे प्रशासकांच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार अकोला जिल्हा उपनिबंधक डी. व्ही कहाळेकर यांनी चौकशीचा आदेश दिला आहे.

या चौकशीसाठी आर. एल. राठोड, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आकोट आणि डी.पी. जाधव अपर विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ सहकारी संस्था अकोला याना नियुक्त केले आहे. यातील चौकशी अधिकारी राठोड यांच्या सुपूत्राचा विवाह सोहळा असल्याने या चौकशीस विलंब होणार आहे. परंतु अनेक तांत्रीक कारणांनी सुरु होण्यापूर्वीच ही चौकशी समिती संशयाच्या भोव-यात आली आहे. त्यामूळे या समितीच्या वैधता व पारदर्शीतेवर मोठे प्रश्नचिन्ह पाय रोवून ऊभे झाले आहे. ते का? हे अल्पावधीतच जनतेसमोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here