आतापर्यंत २५७६१८ क्विंटलची खरेदी…समितीला १२७४९७०२ रुपये सेस प्राप्ती.
आकोट संजय आठवले
संपूर्ण विदर्भात कापसाची खुली निलामी करणा-या एकमेव आकोट बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल ११ हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळत असुन व्यापारानी आतापर्यंत २५७६१८ क्विंटल कापूस खरेदी केलेला आहे. या पोटी आकोट बाजार समितीला १२७४९७०२ रुपये सेस ची मिळकत झाली आहे. बाजार समितीत अजुनही कापसाची विक्रमी आवक सुरु आहे.
आकोट बाजार समितीमध्ये दि २८ आक्टो. पासून कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावर्षी नैसर्गिक आपत्तीचा कापूस ऊत्पादनावर विपरीत परिणाम झाला. त्यातच आकोट परिसरात या वर्षी ६,७ नवीन जिनिंगचा शुभारंभ झाला. त्यामूळे जिनिंगची संख्या १८ वर गेली. तर परवानाधारक व्या-यांची संख्या २० वर गेली. आपला ऊद्योग चालविण्यासाठी जास्तीत जास्त कच्चा माल ऊपलब्ध होण्यासाठी या सर्वांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. संपूर्ण विदर्भात कापसाची खुली निलामी करणारी आकोट ही एकमेव बाजार समिती आहे. त्यामूळे कच्च्या मालासाठी व्यापा-यानी चांगलीच स्पर्धा सुरु केली आहे. परिणामी कापसाला सुरुवातीपासुनच चढा भाव मिळू लागला. ७००० रुपयांपासुन सुरु झालेला प्रति क्विंटल भाव आता ११ हजारावर पोचला आहे. चढ्या भावाची ही किर्ती पंचक्रोशित पसरल्याने शेजारील यवतमाळ, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरीही आपला कापूस आकोट बाजारात आणित आहेत.
हीच किर्ती ऐकून वंचित आघाडीचे सर्वेसर्वा Adv.बाळासाहेब आंबेडकर यानी आकोट बाजार समितीला भेट देवून खुली निलामी प्रक्रिया समजुन घेतली. त्यांच्या मालकीच्या सम्यक जिनिंग प्रेसिंग चिखलगाव ता. अकोला येथे त्यानी ही प्रक्रिया अमलात आणण्याचा प्रयास केला. परंतु तेथिल व्यापा-यानी या प्रक्रियेला काहीच प्रतिसाद न दिल्याने खुली निलामी प्रक्रिया तेथे बासनात गुंडाळावी लागली. अंजनगाव बाजार समितीतही खुल्या निलामीचा हा प्रयोग व्यापा-यानी हाणून पाडला. त्यामूळे शेतक-यांचे हित जोपासणा-या एकमेव आकोट बाजार समितीमध्ये शेतक-यांची रिघ लागली आहे. तर दुसरीकडे शेतक-यांच्या हितासाठी आकोट येथिल व्यापारी कापसाची खुली निलामी प्रक्रिया यशस्वी करित असल्याने समाधान व्यक्त होत आहे.