अवैधरित्या शस्त्र बनविणाऱ्या कारखान्यावर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाची धाड…मोठया प्रमाणात अवैध शस्त्र जप्त…

अकोला – अकोल्यातील अवैधरित्या शस्त्र बनविणाऱ्या कारखान्यावरपोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाची धाड टाकली असून या धाडीत आरोपीसह अवैध शस्त्र तसेच यंत्रसामूग्री जप्त केली आहे.

पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथक दि.१५.१०.२०२० रोजी अकोला शहरात अवैद्यधंद्यावर रेड करणे कामी सरकारी पेट्रोलींग करीत असता रात्री २१:०० वा ए.पी.एम.सी मार्केट रामदास पेठ अकोला येथे हजर असतांना त्यांना त्यांच्या गोपनिय माहीतीदार यांनी खात्री लायक माहीती दिली की,फिरदोस कॉलणी गवळीपूरा अकोला येथील नामे अब्दुल इमराण हा त्याचे घरात अवैद्य शस्त्र तलवार ,रामपूरी चाकू हे विक्री करीता तयार करीत आहे.

अश्या मिळालेल्या माहीती वरुण गुप्त बातमीदारने दिलेल्या बातमी प्रमाणे फिरदोस कॉलणी गवळीपूरा अकोला येथील नामे अब्दुल इमराण याचे घरी जावून पहील्या माळ्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी ०१ ईसम हा अवैधरित्या शस्त्र (तलवार ) मशीन व्दारे तयार करतांना मिळुण आला, त्यास ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे पंचासमक्ष नाव अब्दुल इमराण अब्दुल लतीफ वय २३ वर्ष रा. फिरदोस कॉलणी गवळीपूरा अकोला असे सांगितले,

पंचा समक्ष सदर खोलीची झडती घेतली असता सदर खोली मधे तसेच सज्यावर १) स्टीलच्या एकुण ०३ धारदार तलवारी कि अं९,०००/-रु, २) लोखंडी पात्याच्या एकुण ०७ तलवारी एकुण कि अं १४,000/-रू ३)एक लोखंडी रामपूरी चाकु कि अं १००/-रू ४) पांढ-या धातूचे टोकदार पाते कि अ २००/-रू५) पृष्ठावर बनलेली तलवारची डिझाईन कि 00/-रू ६) एक प्लॉस्टीक मधील चाकूची डिझाईन पोपटी रंगाची कि 00/-रू ७) दोन लाकडी मुठा कि 00/-रू ८) मोजमापाची स्टील पट्टी कि 00/-रु. ९) एक लोखंडी पेन्चीस कि अं १००/-रू

१०) दोन लोखंडी हातोडया कि अं २००/-रू ११) लोखंडी सांडस कि अं १००/-रु १२) लोखंडी जंबुरा कि अं १००/-रु १३) लोखंडी कानस कि अं ५०/-रू १४) दोन लोखंडी पोगर कि अं १००/-रू १५) एक लोखंडी छन्नी कि अं५०/-रु १६) एक लोखंडी १२-१३ चा पाना कि अं१०/-रू १७) दोन वापरते काळया फेम चे चष्मे कि अं १००/-रू १८) दोन लोखंडी हातपकड कि अं २००/-रु १९) BOSCH कंपणीची हॅन्ड गाईन्डर मशीन कि अं २०००/-रू

२०) एक KOBALT कंपणीची लोखंडी कटर मशीन कि अं ४000/-रू २१) एक लोखंडी POWER TECH कंपणीची ड्रिल मशीन बीट सह कि अं १०,000/-रु. २२) एक लोखंडी पांढ-या धातुची पट्टी कि 31 ५००/-रू २३) एक स्टील पाईप कि अं २००/-रू असा एकुण ४१,४१०/-रूपयांचे अवैद्यशस्त्र तसेच शस्त्र बनविण्याचे उपयोगी येणारे साहीत्य मिळुन आल्याणे ते पंचनामा कार्यवाही प्रमाणे जप्त करूण ताब्यात घेतले.

नमूद इसम हा त्याच्या आर्थीक फायदयाकरीता त्याच्या उपरोक्त नमूद घरी अवैधरित्या शस्त्रे बनविण्याचा कारखाना चालवीत असतांना उपरोक्त नमूद मुद्देमालसह मिळून आला. त्याच्याकडून उपरोक्त नमूद मुमाल जप्त करण्यात आला असून त्याचे विरूध्द कलम ४,२५ आर्म अॅक्ट सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम प्रमाणे पो स्टे रामदासपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद कारवाई ही मा श्री जी श्रीधर पोलीस अधीक्षक अकोला तसेच मा श्रीमती मोनीका राऊत अपर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंदकूमार अ.बहाकर पोलीस निरिक्षक विशेष पथक अकोला व त्यांच्या
पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here