अकोल्याचे वादग्रस्त जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांची अखेर बदली…जी.श्रीधर अकोल्याचे नवे जिल्हा पोलीस अधिक्षक

अकोल्याचे वादग्रस्त जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांची अखेर बदली झालीये. अकोल्यातील बहूचर्चित मुली प्रकरणात हलगर्जी आणि असंवेदनशीलतेचा ठपका ठेवत त्यांची बदली झाली होतीय.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 28 फेब्रूवारीला अधिवेशनादरम्यान गावकर यांच्या बदलीचे आदेश दिले होतेय. तर दोन तपास अधिकाऱ्यांनाही या प्रकरणी निलंबित करण्यात आलं होतंय.

मात्र, बदलीनंतरही तब्बल तीन महिन्यांपासून गावकर अकोल्यातच ठाण मांडून बसले होतेय. फेब्रूवारी महिन्यात गृहमंत्र्यांनी म्हणून त्यांनी गावकर यांच्या बदलीचे आदेश दिले होतेय. गावकर यांची बदली अमरावती येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिक्षक म्हणून करण्यात आलीय.

दरम्यान, गावकर यांच्या ठिकाणी आता जी. श्रीधर अकोल्याचे नवे जिल्हा पोलीस अधिक्षक असतील.

दरम्यान, एप्रिल महिन्यात पोलीस निरिक्षक सुरेश नाईकनवरे यांनी अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे गावकर यांची तक्रार केली होतीय. गावकर यांच्या मानसिक त्रासामूळे आपण आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असल्याचं सांगणारे त्यांचे पत्र प्रचंड व्हायरल झाले होतेय.

याप्रकरणी शासनानं नागपुरचे विशेष पोलीस महानिरिक्षक इ. प्रसन्ना यांची चौकशी समिती नेमली होतीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here