अकोला ZP निवडणूक । लाखपूरी सर्कल मध्ये पार्सल चालणार का?

अकोला जिल्हा परिषदेच्या 14 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती. त्या अनुषंगाने ती पुढे ढकलली मात्र ती केव्हाही लागू होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील 14 ही सर्कल मध्ये उमेदवार ऍक्टिव्ह असून दररोज कार्यकर्त्यांना सायंकाळची सोय करतात.

अकोला जिल्ह्यातील दुसऱ्या सर्कलमधून नाकारलेले सदस्य सध्या मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपूरी सर्कलवर अतोनात खर्च करीत आहे. या भागातील शेतीची कामे आटोपल्याने बरेच कार्यकर्ते खाली असल्याने तेही त्याचा भरपूर फायदा घेत आहेत. निवडणूक पूर्वी जे जे साध्य होत असेल तो ते घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या सर्कल मध्ये महाविकास आघाडीचे आणि वंचित वर्चस्व असल्याचे माहिती मिअलाली असून त्यामुळे या सर्कलवर जास्त मेहनत घेणे सध्यातरी व्यर्थ आहे.

या दोन आठवड्यात कधीही पुन्हा निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो त्यामुळे उमेदवार हे आपआपल्या मतदार संघात मतदारांची काळजी घेत आहेत.त्यासाठी सर्कलमध्ये काही घडलं तर लगेच हजर होतात. सोबतच मदतीचा ओघतर सुरूच आहे. लाखपूरी सर्कल मध्ये इतर दुसऱ्या सर्कल मधून नाकारलेले उमेदवाराने जोरदार वाटपाचे काम सुरू केले असून दररोज पार्ट्या, नवीन नवीन कार्यकर्ते जोडणे जुने कार्यकर्त्यांना हो हो करीत घरीच बसवून ठेवणे असे सध्या सुरू आहे.

या सर्कल मध्ये राणा पॅटर्न राबविणार असल्याची माहिती मिळाली असून जमेल तसं हा उमेदवार प्रयत्न करीत आहे तर एका पक्षाच्या उमेदवाराला बसवू, विकत घेऊ अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र ज्या उमेदवाराला विकत घ्यायचं ठरवलं तो उमेदवार याच्या सारखे 10 विकत घेण्याची ताकद ठेवते असे माहिती सूत्राने दिली आहे.

तर हा लबाड कोल्हा असल्याचे संपूर्ण जिल्ह्यात माहिती आतापर्यंत याने तीन-चार पक्ष बदलले मात्र एकाही पक्षात याचा टिकाव लागला नाही. म्हणून आता अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा हा उमेदवार मिळवू शकतो. यांच्याकडे जेवढे पैसे आहते तेवढ्याच थापा सुद्धा आहेत. अनेकांना हा 10 च्या जागी 100 जाहीर करतो आणि जेव्हा तुम्हाला 100 मागायची वेळ येते तेव्हा, तुम्हालाच पुढील अनुभव येतो मग आपसूकच तुमच्या तोंडातुन…. ‘तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी हाणाव्या पैजरा’ हे शब्द बाहेर पडतात….(क्रमश)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here