Ad
Home अकोला

अकोला ZP निवडणूक । लाखपूरी सर्कलचे मतदार एवढे लाचार?…

Ad

स्थगित झालेली अकोला ZP पोटनिवडणुकीला पुन्हा हिरवी झेंडी मिळाल्याने आता 21 तारखेपासून खरी प्रचाराला सुरुवात होणार आहे, मात्र त्याआधीच एकदोन महिन्या पासून मतदार संघात उमेदवार आश्वासनची खैरात वाटपाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. सोबत खैरात घेणाऱ्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत. तुम्हाला मदत केल्याचं मार्केटिंग सध्या जोरात सुरू आहे.

निवडणूक म्हटले तर प्रलोभने आलीच तर कधीच भेटलं नाही असा हावरट पणा सध्या लाखपूरी सर्कलमध्ये पाहायला मिळत आहे, यामध्ये समाजातील काही चांगल्या लोकांचे चेहरे दिसत असल्याने अक्षरशः चीड निर्माण होत असल्याचे मतदार संघातील जाणकारांचे मत आहे.

तर सोशल मीडियावर फोटो पाहून खारपाण पट्टा विकासापासून किती मागासलेला आहे हेही सिद्ध होते. निवडणूक काळात घेतलेली मदत ही लोकांना सांगण्याची गरज पडत नाही तर अवघ्या जिल्ह्यात तुमचे फोटो व्हायरल होत असल्याने म्हणूनच लाखपूरी सर्कलच नाव आता कोणत्या श्रेणी मध्ये येत असेल ते न सांगितलं बर.

Ad

ओबीसी आरक्षणामुळे मतदार संघाचं दुर्दैव म्हणावं सोबतच निवडून आलेल्या प्रतिनिधीच सुद्धा, अवघ्या एकाच वर्षात पद रद्द झालं आणि आता पुन्हा तेच जे अगोदर केलंय. किती जड जाईल त्या सदस्याला? एकवर्षं तर ZP काय आहे हेच समजायला वेळ जातो. त्यात तो सोंगाडेपणा करणारा राजकारणी नाही तर धडपड करणारा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे.

पूर्णा काठेवर असणाऱ्यांचा कोणीच वाली नाही? साधारण 14 वर्षा आधी माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी एक प्रोजेक्ट आणला ‘घुंगशी बॅरेज’ त्याचाही फायदा या सर्कलच्या जनतेला झाला नाही, तो कधी होईल? सिंचनाचा प्रश्न अजूनही सुटला नाही. तो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दमदार प्रतिनिधीच पाहिजे, लोकप्रतिनिधी (जुली) तर करणार नाही, कारण तुम्ही त्याला मतदान केले नाही. तो गेल्यावरच विचारतो तुमच्या भागात मी दुसऱ्या नं ला होतो…

मग तुमचा सिंचनाचा ,पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणार कोण? एकतर ज्याची सत्ता असेल किंवा ज्याची ताकद असेल सभागृहात प्रश्न मांडायची, कामे खेचून आणण्याची अकोला ZP एवढी सोपी नाही म्हणून असाच व्यक्ती निवडा जेणेकरून तुमचा वयक्तिक विकास बाजूला सावरून तुमच्या भागात विकासाची गंगा आणणारा…आताच नाही तर पुढच बघा…तुम्हाला विकत घेतल्यासारख हे लोक पुढ वावरतात…अनेक लोकांना अनुभव आलेत ते पुढे मांडणारच…..

Ad

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here