अकोला ZP निवडणूक | पैश्याचा महापूर आणि साहेबांची बदनामी ?…

अकोला पोटनिवडणुकीत लाखपुरी सर्कल मध्ये सध्या एका अपक्ष उमेदवाराकडून पैशाचा महापूर वाहत आहे. मतदारांच्या सर्वच हौस पुरविल्या जात असल्याचे प्रकार सुरु आहे. बाकी इतर पक्षाचे उमेदवार मुंग गिळून गप्प आहेत. कारण त्यांना कायदा माहित नाही किंवा त्यांची तक्रार करण्याची हिम्मत होत नाही. त्याबरोबर निवडणूक अधिकार्यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरु आहे. मात्र त्यांचीही अशीच अवस्था आहे. खरंच मते खरेदी करता येतात का? मते खरेदी करून निवडणुका जिंकता येतात का?…निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना जागृत करण्यासाठी जाहिरातीद्वारे प्रयत्न केल्या जातात मात्र या मतदार संघात सर्वच प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.

या सर्कल मध्ये साम-दाम-दंड- भेद या नीतीचा वापर एका अपक्ष उमेदवाराकडून होत आहे, हा अपक्ष उमेदवार गेल्या 15 वर्षात वेगवेगळ्या ठिकाणावरून निवडणूक लढवीत आहे. त्यासाठी दोन पक्ष एक संघटना सुद्धा बदलली आहे. तर याला एकदा बहुजनाचे नेते बाळासाहेबांनी याला संधी देवून निवडून आणले होते मात्र त्याच्या ढिसाळ कामगिरीमुळे त्याला पुढच्या वेळेस वगळले असल्याचा राग मनात घेवून त्याने चक्क बाळासाहेबांच्या विरोधातच मोहीम उघडल्याचे सदर सर्कल मध्ये निदर्शनास आले.

ज्या नेत्याला आपला आदर्श मानणारा समाज आता त्याच नेत्याविषयी उलटसुलट बोलत आहे. भोळी भाबडी जनताही त्याच्यावर विस्वास करीत आहे, कारण त्याची पटवून सांगण्याची पद्धत खूप वेगळी आणि सोबत पैसे दिल्यावर तुम्हाला ऐकावेच लागणार आहे. याच्यासोबत राहणारा सल्लागारही तेवढीच जबाबदारी पार पाडत आहे. ज्या नेत्यामुळे याला पाच वर्ष सदस्यपद भोगता आले, आता त्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे मत काही कार्यकर्त्यांचे आहे. अश्या विश्वासघाती व्यक्तीला त्याची जागा दाखवून देवू असे एका कार्यकर्त्याने सांगितले आहे.

या सर्कलमध्ये मतदान करण्यासाठी मतदारांना काय प्रोत्साहित करत असेल? साधारणतः उमेदवाराची ओळख, त्याची विचारसरणी, जात, त्याच्या कामगिरीमुळे प्रभावित होत असेल. मात्र गरीब आणि असुशिक्षित, काही सुशिक्षित मतदारांचं मत वळवण्याकरिता लाचेच्या स्वरूपात पैसे किंवा वस्तू सारखी प्रलोभने देवून मतदारांना प्रभावित करणं मतदानाची पद्धत आहे का ?असा प्रश्न काही सुज्ञ नागरिकांना पडला आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here