अकोला ZP निवडणूकींची रणधुमाळी…सर्व उमेदवारांवर असणार प्रशासनाची नजर…

न्यूज डेस्क – राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकां आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या होत्या त्या आता पुन्हा त्याच टप्प्यावरून सुरुवात होणार आहे. पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होत्या परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती. त्यांनतर त्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर कालच निवडणुका आयोगाने त्या निवडणुकांना पुन्हा हिरवी झेंडी दिल्याने आता रणधुमाळी सुरु होणार आहे.

अकोला जिल्ह्यात जि.प.व पं.स.च्या निवडणुकीत एकूण २५६ उमेदवारांचे भवितव्य येत्या 6 ऑक्टोबरला ठरणार आहे. अकोला जिल्हा परिषेदवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. वंचित आणि भाजपा हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. त्यांनी सर्व जागांसाठीचे उमेदवार जाहीर करून त्यांचे अर्जही वैध ठरले आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असून, जागा वाटप, अर्ज भरण्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. त्यामुळे स्थगिती उठली तरी या चार पक्षांमध्ये आता नवीन उमेदवार उतरवण्याचा मुद्दा राहिलेला नाही. मात्र काही उमेदवारी माघार घेऊ शकतील, त्यासाठी २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हि शेवटीची तारीख असेल.

महाविकास आघाडीतील काँग्रेसने स्वबळाचा नारा देत जि.प.साठी १४ पैकी १२, तर प.सं.साठी २८ पैकी २३ उमेदवारांचीच घाेषणा केली हाेती. उर्वरित जागांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व काँग्रेसमध्ये चर्चाही झाली. आता निवडणुकीवरील स्थगिती उठल्यानंतर दाेन्ही पक्षांना साेबत मैदानात उतरण्यासाठी वाव आहे.

मतदानाची तारीख – ५ ऑक्टोबर २०२१
मतमोजणी ६ ऑक्टो.

जिल्हा परिषद गट – दानापूर, अडगाव बु. तळेगाव शु, अकोलखेड, कुटासा, लाखपुरी, बपोरी, धुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदुरा, देगाच, दगडपारवा व शिर्ला

पंचायत समिती गण -हिवरखेड, अडगाव बु, बाडी अदमपूर, भाबेरी, पिणो खुर्द, अकोलखेड, मुंडगाव, रोदिळा, लाखपुरी, बझी खुर्द, माना, कानडी, दहीहांडा, धुसर,पळसो, कुरणखेड, चिखलगाव, निमकर्दा, पारस भाग १, देगाव, वाडेगाव भाग २, दगड- पारवा, मोहळ, महान, पुनोती बु. शिला, खानापूर व आलेगाव

निवडणूक आचार संहिता जरी आजपासून लागू झाली असली तरी उमेदवारांच्या खर्चाचा लेखाजोखा हा 21 सप्टेंबर लागू होणार आहे. सर्व उमेदवारांवर प्रशासनाची नजर असणार आहे. प्रचार सभेसाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी देण्यात येणार आहे व यापूर्वी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगामार्फत देण्यात आले आहेत….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here