अकोला | शहरात दुचाकी वाहनावर डबलसीट बंदी का ?…कोरोनाच्या लढाईत पोलीस उन्हातान्हात उभे असतात कुणासाठी ?

अकोल्यात कोरोना प्रमाण दिवसे दिवस वाढतच आहे वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय यंत्रणेवर चांगलाच ताण येत आहे. त्यातून अनेक उणिवादेखील समोर आल्या आहेत तर या लढाईत महत्त्वाची भूमिका पोलिसांची सुद्धा आहे मात्र याच पोलिसाचे जेव्हा खच्चीकरण केले जात असल्याचे चित्र सध्यस्थिती दिसत आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात लाठी मारली म्हणून पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनासारखे प्रकार घडले. नंतर ते मागे घेण्यात आले, तरी या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल चांगलेच खचून गेले.

कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शहरात दुचाकीवाहनावर डबलसीट वर बंदी आणल्या गेलीय मात्र याचा कुठलाही परिणाम अकोलेकरांवर झाला नसून दरोरोज शहर वाहतूक पोलीस कारवाई करीत तब्बल

आता पर्यंत 32 गुन्हे शहराच्या विविध पोलीस स्टेशन मध्ये दाखल करून जवळपास 650 दुचाकी जप्त करून शहर वाहतूक कार्यालय व शहराच्या सर्व पोलीस स्टेशन मध्ये ही वाहने लावण्यात आली आहेत

सध्या परिस्थिती ही आहे की जागा अपुरी पडत आहे परंतु दुचाकीवरून डबल सीट फिरणाऱ्यां ची संख्या मात्र कमी होतांना दिसत नाही आहे, हे लक्षात घेता पोलिसांनी डबल सीट चालणाऱ्या दुचाकी मोहीम आणखी तीव्र करण्याची गरज असतांना राजकीय हस्तक्षेप मुळे पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होऊन

पोलिसांची मोहीम बरगळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, अश्या परिस्थिती मध्ये वाढणाऱ्या करोना बाधितांचया संख्येत घाट कशी होणार हा संशोधनाचा विषय आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here