Ad
Home Breaking News in Marathi

अकोला | ट्रक व कारच्या भीषण अपघातात तीन ठार तर एक गंभीर…

Ad

अकोला ते बाळापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील रिधोरा जवळील रिलायन्स च्या पेट्रोल पंपाजवळ कार आणि ट्रक च्या भीषण अपघात तीन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री 1 च्या सुमारास घडली. तर अपघात एवढा भीषण होता की या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला.

अकोला ते बाळापूर महामार्गावर रिधोरा गावाजवळील आज रात्री 12:45 ते 1:00 च्या दरम्यान शेगाव कडून येत असलेल्या एम एच 37 जी 8262 ही कार वाशिम कडे जात असतांना ट्रक व कारच्या भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कार मधील तीन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे घटनस्थळी दाखल झाल्यानंतर मृतकांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते, अपघात एवढा भयंकर होता की मृतक अक्षरशा कार मधील तिघे पूर्णपणे दबले गेले होते. तर एकाला गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी अकोला सरोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.

Ad

आताच मिळालेल्या माहिती नुसार अपघातात ४ तरुणांचा मृत्यू झाले असल्याची माहिती,मृतकांमध्ये पांगरी(कुटे)ता.मालेगांव जि. वाशिम येथील धनंजय नवघरे,विशाल नवघरे,मंगेश राऊत आणि शुभम कुटे यांचा समावेश, अपघातात ठार झाले तरुण हे ३० वर्षाच्या आतील आहेत. बाळापूर पोलीस अधिक तपास सुरु आहे.

Ad

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here