अकोला | युवतीवर सतत चार वर्ष बलात्कार करणारा शिक्षक गजाआड…

फोटो- सांकेतिक

अकोला – शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, अकोल्यातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या एका युवतीवर शाळा कॉलेजमध्ये एनसीसी प्रशिक्षण देणाऱ्या नराधमांने वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर असे की, एका महाविद्यालयीन युवतीला प्रशिक्षणाच्या नावाखाली आपल्या जाळ्यात फसवुन सतत चार वर्षे वारंवार बलात्कार करण्याची घटना शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली. सदर युवती हि सज्ञान असल्याने या दोघांमध्ये प्रेमसंबध असल्याची माहिती मिळाली आहे.

रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात प्रशिक्षण केंद्र चालवत असलेल्या अमित जाधव रा. हरिहर पेठ या आरोपीचे रामदास पेठ येथे प्रशिक्षण केंद्र आहे. याच ठिकाणी एका महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकणाऱ्या युवतीची ओळख आरोपी सोबत झाली त्यानंतर या प्रशिक्षणार्थी आरोपीने सदर युवतीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून सलग चार वर्षं विविध ठिकाणी पीडितेवर बलात्‍कार केल्याची तक्रार सदर युवतीने रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे दाखल केली.

आरोपीविरोधात रामदास पेठ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास पीसआय भरत निकाळजे करत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अपर पोलीस अधीक्षका मोनिका राऊत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास पेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार विलास पाटील यांच्यासह पीएसआय भरत निकाळजे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here