Friday, March 29, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | तिला ‘क्राइम शो’ पाहण्याची आवड होती...मग आपल्याच मोठ्या बहिणीची केली...

अकोला | तिला ‘क्राइम शो’ पाहण्याची आवड होती…मग आपल्याच मोठ्या बहिणीची केली हत्या!…

Share

अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पाेलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खडका गावात एक धक्कादायक घटना समोर आलीय. लहान बहिणीने आपल्या मोठ्या बहिणीची हत्या केल्याने केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविना वसतकार वय वर्ष २१ असे आरोपीचे नाव असून तिला बोरगाव मंजू पोलिसांनी ताब्यात घेतलय…

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खडका गावात राहणारे विठ्ठल वसतकार हे पत्नी, दोन मुली व एक मुलासह राहत राहतात. मोठी मुलगी रेश्माचा (२४) विवाह झाला होता. लहान मुलगी रविना (२१) ही घरीच राहत होती. रविना हिला ‘क्राईम शो’ खूप आवडायचा त्यामधील रक्तरंजित हत्या, प्राणघातक हल्ले पाहून रविनाच्या मनावर परिणाम झाला. तसेच ती मानसिक आजारी असल्याचेही बोलले जाते.

गेल्या काही महिन्यांपासून रविना मानसिक तणावात होती. तिच्यावर मनोरुग्ण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची देखील माहिती मिळाली आहे. दरम्यान, गत आठवड्यात मोठी मुलगी रेश्मा माहेरी आली. दरम्यान, २९ मे रोजी उशिरा रात्री विठ्ठल वसतकार व त्यांची पत्नी घरात बसले होते. दोन्ही बहिणी खोलीमध्ये बोलत असतांना त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात लहान बहिण रविनाने धारदार चाकूने मोठी बहिण रेश्मावर जीव जाईपर्यंत सपासप वार केले.

प्रचंड गोंधळ ऐकून आई-वडील खोलीत दाखल होताच त्यांना मोठी मुलगी रेश्मा ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. हे पाहून आई-वडिलांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून रेश्माचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी रविनाला अटक करून तिच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: