Monday, February 26, 2024
Homeराज्यअकोला म्हणतोय "ये दिल मांगे…बाळासाहब आंबेडकर, शहरात लाल रंगाच्या बॅनरने जनतेचे वेधले...

अकोला म्हणतोय “ये दिल मांगे…बाळासाहब आंबेडकर, शहरात लाल रंगाच्या बॅनरने जनतेचे वेधले लक्ष..!

Share

अकोला – महाराष्ट्रात फोडाफाडीचे राजकारण सुरू असताना. संपूर्ण अकोला शहर लाल रंगाने न्हावून निघाले आहे. व्हॅलेंनटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे प्रतिक असलेल्या लाल रंगांचे बॅनर्स शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर दिसत असून बॅनर्सवर ये दिल मांगे… बालासाहब आंबेडकर असा मजकूरही आहे. त्यामुळे या लाल रंगाच्या बॅनरची चर्चा अकोल्यात होताना दिसत आहे.

या लाल रंगातून व्हॅलेन्टाईन डेच्या प्रेमाचा संदेश तर आहेत. यातून काही राजकीय संदेश आहे का? याची सुद्धा चर्चा आहे. शिवाय महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य करत असल्याचे दिसून येत आहे. कारण, त्यांच्या बॅनर्सवर ये दिल मांगे… बालासाहब आंबेडकर अशा आशयाचे वेगवेगळ्या आशयाचे बॅनर्स ही छायाचित्रांसह संपूर्ण शहरात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या आशयाचा अंदाज हेरला असून अकोल्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशालादेखील बाळासाहेबांसारख्या निर्भिड नेतृत्वाची गरज असल्याची चर्चा होत आहे.

याआधी देखील त्यांचे बॅनर्स अकोला शहरात त्यांच्या छायाचित्रांसह झळकले होते. मात्र, त्यावेळी बॅनर्सवर अकोला में तो बस प्रकाश आंबेडकर चल रहे हैं, हिम्मतवाला, यही है राईट चॉईस, जिंदा बंदा, निडर – बेखौफ – बेबाक, असा आशय होता.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर देखील राज्यभर दौरे आणि सभा करत आहेत. प्रकाश आंबेडकर म्हटलं की, चर्चा होते अकोला लोकसभा मतदारसंघाची. याच मतदारसंघात नवीन वर्षाच्या सुरुवातीला ‘नया साल, नया खासदार’ अशा आशयाचे बॅनर लागले होते. आता पुन्हा अशाच प्रकारचे बॅनर्स अकोल्यातील जठार पेठ, सिव्हिल लाईन चौकात लागले आहेत.

वंचित बहुजन आघाडीने अकोला मतदारसंघाची बांधणी मजबूतरित्या केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत दररोज पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद या मतदारसंघात वाढल्याचे दिसत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात बदल होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळासह सामान्य जनतेमध्ये आहे.

या बॅनरने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी अकोल्यात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. सबंध राज्यभर एवढ्या मोठ्या सभेची चर्चा रंगली होती.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: