अकोला पोलिसांची नो मास्क नो सवारी मोहीम सुरू, शहरातील प्रत्येक ऑटो वर लावणार पोस्टर्स, सूचना न मानणाऱ्याऑटो वर होणार दंडात्मक कारवाई…

डेस्क न्युज – अकोला शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर पाहता प्रशासना सोबतच सर्व स्तरातील नागरिकांनी समोर येण्याची आवश्यकता पाहता, अकोला पोलिसांनी पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी शहरात सर्व सामान्य जनतेला जागृत करण्यासाठी नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो बुक्स,

नो मास्क नो डील ह्या सारखे उपक्रम सुरू करून संबधीत संघटनेच्या सहकार्याने सर्व सामान्य नागरिकांना कोरोनाचा पराभव करण्यासाठी प्रशासनाचे हातात हात देऊन पुढे येण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे, त्याचाच एक भाग म्हणून अकोला शहरात धावणारे जवळ पास 2000 ऑटो वर नो मास्क नो सवारी चे पोस्टर्स लावण्याची मोहीम सुरू केली आहे,

त्या साठी पाहिले दोन दिवस ऑटो चालकांची शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या अंतर्गत सर्व ऑटो चालकांनी स्वतः मास्क घालावे व ऑटो मध्ये प्रवास करणाऱ्या सवारी ला सुद्धा मास्क घालणे बंधनकारक करावे,

सवारी मास्क घालण्यासाठी तयार नसल्यास अशी सवारी ऑटो मध्ये बसवून घेऊ नये, ह्या माध्यमातून स्वतः ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले, त्याला ऑटो चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, शहरात दररोज जवळपास 2000 ऑटो धावत असल्याने ह्या मधून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात,

ह्या मोहिमेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना प्रबोधन करणे शक्य असल्याने ही मोहीम शहर वाहतूक शाखे कडून शहरात राबविण्यात येणार असून दिलेल्या सुचनेचे पालन न करणाऱ्या ऑटो चालकांनी दंडात्मक कारवाईस तयार राहावे असा इशारा सुद्धा वाहतूक शाखेने दिला आहे,

ऑटो चालकांना सूचना दिल्या नंतर आज शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम व शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे उपस्थिती मध्ये ऑटो वर” नो मास्क नो सवारी” असा उल्लेख असलेले पोस्टर्स लावणे सुरू केले,

सदर पोस्टर्स साठी खंडेलवाल ज्वेलर्स व विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष नितीन खंडेलवाल ह्यांचे सहकार्य लाभले, येत्या 2 दिवसात शहरातील जवळपास 1200 ऑटो वर असे पोस्टर्स शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी लावणार असून सूचना न पाळणाऱ्या ऑटो वर कारवाई आरंभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here