अकोला – नवरा बायकोचे भांडण सोडविणे सासूच्या जीवावर बेतले, जावयाचे सासुलाच विहिरीत ढकलून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव पोलिस चौकी अंतर्गत येत असलेल्या शेतशिवरात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी चंद्रकला डाखोरे असे मृत सासूचे नाव आहे. विलास इंगळे असे सासूला विहिरीत ढकलणाऱ्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जावयाचा शोध घेण्यात येत आहे.
घरगुती कारणावरून विलास इंगळे व त्याच्या पत्नीमधील वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जाऊ नये, म्हणून सासू चंद्रकला डाखोरे यांनी वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, रागाच्या भरात जावई विलास इंगळे याने सासू चंद्रकला डाखोरे यांना फरफटत नेत घरासमोरील विहिरीमध्ये ढकलून दिले. चंद्रकला डाखोरे यांची मुलगी तथा विलास इंगळे यांची पत्नी तिने या घटनेला विरोध केला. परंतु, बराच वेळ होऊन गेला होता. या संदर्भामध्ये वाडेगाव पोलीस चौकीतील पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी बाळापुर पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे पथकास दाखल झाले. त्यांनी सासूचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. घटनेचा पंचनामा केला. आरोपी जावई विलास इंगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे.