अकोला | “या” भामट्याने हरभरा रखवाली मुलाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल केला लंपास…

नया अंदुरा : दोन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवरुन येवून नया अंदुरा एका मुलाच्या हातात असलेला मोबाईल पळवून नेल्याची घटना नया अंदुरा नजीक हाता चौपुलीवर घडली आहे.

महादेव संजय अढाऊ (१७) हे आपल्या मित्राबरोबर वन्यप्राण्यांच्या वाढत्या हैदोसानेमुळे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास रोडवरील शेतातील हरभरा पिकावर रखवाली करत असताना हातात मोबाईल असताना दोन अनोळखी इसम मोटार सायकलवरुन आले व चाकूचा धाक दाखवून त्यांनी त्या ठिकाणी असलेला अकरा हजार चारशे रुपये किंमतीचा मोबाईल घेवून ते पसार झाले आहेत.

याबाबतची तक्रार उरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.पुढील तपास उरळ पोलीस स्टेशन करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here