अकोला | पाेलिस कोठडीत ‘अनैसर्गिक लैंगिक’ अत्याचार प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेमधील एपीआयसह चार पोलिस निलंबित…

फोटो -फाईल

अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीत सराफा व्यावसायिकाचा पोलिसांनी छळ केला आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस शिपाई शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, मोंटी यादव, काटकर आणि चालक पवार अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचार्यांची नावे आहेत.

शेगाव येथील एका सराफा व्यावसायिकाला 9 जानेवारीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचे सोने खरेदी प्रकरणी रात्री 3 वाजता शेगावातून अटक केली होतीय. शेगावातून अकोल्यात आणतांना गाडीतच आरोपीला प्रचंड मारहाण करण्यात आली. रविवारी आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. या दोन दिवसांत आरोपी सराफा व्यापाऱ्याला एपीआय चव्हाण आणि काँस्टेबल कांबळे याने उलटे करून मारहाण केल्याचा आरोप होता.

सोबतच इतर आरोपींकरवी त्याच्यावर अत्याचार केले. इतकेच नव्हे तर पोलिसांनी अंगावर गरम पाणीसुद्धा फेकले. पोलिस कोठडी संपल्यानंतर जेव्हा आरोपी बाहेर आला तेव्हा त्यांनी पोलिसांवर आरोप केले. पोलिसांच्या धाकापोटी आपण न्यायालयालासुद्धा सांगू शकलो नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षकांकडे सराफा व्यावसायिकांनी तक्रार केली.

त्यानंतर या प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी शहर पोलिस उपविभागीय अधिकारी यांची एक चौकशी समिती नेमली होती. त्यानंतर अमरावती परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी या प्रकरणी बुलडाणा जिल्हा पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपवली. या चौकशीच्या अहवालानंतर पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सराफ व्यावसायिकावर कारवाईसाठी गेलेली पोलीस टीम दोषी आढळल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस शिपाई शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, मोंटी यादव, काटकर आणि चालक पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here