अकोला जिल्हा उपनिबंधक कहाळेकरसह ४ अधिकाऱ्यांनी केला ३२ लक्ष रुपयांचा अपहार…विवेक टाले यांचा सनसनाटी आरोप…

फोटो -सौजन्य गुगल

चौकशी सुरु…द्वितिय सुनावणी १७ मे रोजी.

आकोट, संजय आठवले

अकोला येथिल अवसायनात निघालेल्या दी ब्रिजलाल बियाणी क्रेडिट को. ऑप. सोसायटी लि. च्या मालमत्ता विक्री प्रक्रीयेत शासकिय नियमांची पायमल्ली करुन अकोला जिल्हा उपनिबंधक कहाळेकरसह सहायक निबंधक एस.डब्ल्यु. खाडे, सहकार अधिकारी गोपाळ भास्कर कुळकर्णी व लेखा परिक्षक व्ही. व्ही. सपकाळ या चौघानी सुमारे ३२ लक्ष रुपयांचा अपहार केल्याचा आरोप विवेक खंडेराव टाले रा. अकोला यांनी केला आहे. त्यांच्या या खळबळजनक तक्रारीवरुन वरील चारही अधिका-यांची विभागिय चौकशी सुरु करण्यात आली आहे. या संदर्भातील दि.९ मे रोजीच्या प्रथम सुनावणीत कहाळेकर यानी आपल्यावरिल आरोप फेटाळले असले तरी या प्रकरणी होणा-या द्वितिय सुनावणीत विवेक टाले यानी सक्षम पुरावे व अधिकची साधार माहीती देण्यासाठी वेळ मागीतल्याने या प्रकरणाची द्वितिय सुनावणी १७ मे रोजी होणार आहे.

याबाबत सविस्तर असे कि, दि ब्रिजलाल बियाणी क्रेडिट को. ऑप. सोसायटी ली. अकोला ही संस्था अवसायनात निघाली. त्यावर मुख्य अवसायक म्हणून एस. डब्ल्यु खाडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक, मुख्य अवसायक तथा सहाय्यक अवसायक अशा चौघानी या संस्थेची मौजे मलकापूर कोठारी संकुल सहकार नगर गोरक्षण रोड अकोला येथिल दुकान क्र. १४ व १५ या मालमत्तेची विक्री केली. या विक्री प्रक्रीयेवर विवेक खंडेराव टाले रा. अकोला यानी आक्षेप घेवून जिल्हा ऊपनिबंधक कहाळेकर, मुख्य अवसायक एस. डब्ल्यु. खाडे, सहाय्यक अवसायक गोपाळ भास्कर कुळकर्णी व व्ही. व्ही. सपकाळ या चार अधिका-यानी ह्या विक्री प्रक्रीयेत सुमारे ३२ लक्ष रुपयांचा अपहार केल्याची तक्रार सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांचेकडे केली.

शासकिय परिपत्रकानुसार सहकारी संस्थांच्या स्थावर/ जंगम मालमत्ता विक्रीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले गेले आहेत. मात्र ही मालमत्ता ऑफलाईन पद्धतीने विकण्यात आली. असे केल्याने या संदर्भात योग्य ती माहीती योग्य त्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचली नाही. त्याने ह्या विक्री संबंधात योग्य ती स्पर्धा निर्माण झाली नाही. त्या अभावी ही मालमत्ता (दोन दुकाने) केवळ १८ लक्ष ४१ रुपयात विकली गेली. जेंव्हा कि, याच मार्गावरिल निकटच्याच कोठारी वाटीका संकुल २ मधील दोन दुकाने ५० लक्ष रुपयाना विकल्या गेले आहेत. ते पाहू जाता या व्यवहारात ३२ लक्ष रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या मालमत्तेची दोन्ही दुकाने २२५.४२ चौ.फू. असल्याचे दर्शविले गेले आहे. प्रत्यक्षात मात्र ही दुकाने प्रत्येकी १३.७५, १३.७५ चौ. मी. अर्थात २९५. ९० चौ. फु. आकाराची आहेत. म्हणजे ही दोन्ही दुकाने कमी आकाराची दर्शवून त्यांचे मूल्यानिर्धारण करण्यात आले. त्यानंतर त्या कमी दराने ही दुकाने विकुन खरेदीदारास चक्क ७०.४८ चौ, फु. जागा फुकटात दिली गेल्याचे ध्यानात येते. हा सारा प्रकार ऑनलाईन पद्धतीने “मॅनेज” करता आला नसता. त्यामूळे ही मालमत्ता “मॅनेज” करुन ऑफलाईन पद्धतीने विकल्या गेल्याचे स्पष्ट दिसते. या म्हणण्यासोबतच या प्रकरणातील मुख्य अवसायक एस, डब्ल्यु, खाडे यांचा पूर्वेतिहास अपराधीक असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

अकोला जिल्हा मजुर, कामगार सहकारी संस्थांचा संघ या संस्थेची निवडणूक झाल्यावरही खाडेंनी निवडणूक निकाल अनेक वर्षे रखडत ठेवीत घोषित केला नाही. वाशिम खरेदी विक्री सहाकारी संस्था कामकाजात आर्थिक अफरातफर केल्याने खाडेंवर वाशिम येथे सन २०२१ मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल केला गेला आहे. यासोबतच कार्यालयीन कामकाजाबाबत अनेक तक्रारींमूळे त्यांची विभागीय चौकशी सुरु असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. आताही दि ब्रिजलाल बियाणी संस्थेच्या मालमत्तेबाबत जिल्हा उपनिबंधक कहाळेकर, मुख्य अवसायक एस. डब्ल्यु. खाडे, सहाय्यक अवसायक गोपाळ कुळकर्णी व व्ही. व्ही. सपकाळ या चौघानी संगनमत करुन मोठा घोळ घालण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामूळे या चौघानाही त्वरित निलंबीत करुन सखोल चौकशीनंतर त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तक्रारदार विवेक टाले यानी सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था पुणे यांचेकडे केली आहे.

या तक्रारीची दखल घेवून साधना देशमुख उपनिबंधक (दक्षता) सहकारी संस्था यानी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती याना चौकशीचा आदेश दिला आहे. त्यासाठी ऊभय पक्षाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विभागीय सहनिबंधक अमरावती यांचे कार्यालयात दि.९ मे रोजी प्रथम सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी दरम्यान आपल्या लिखित बयानात जिल्हा उपनिबंधक कहाळेकर यानी तक्रादाराचे आरोप फेटाळले आहेत, आपण राबविलेली प्रक्रिया अतिशय पारदर्शी व प्रचलीत नियमानुसार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यावर तक्रारदाराने कुरघोडी करुन कहाळेकर यांचे बयानावर सबळ पुरावे व अधिकची साधार माहिती सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. तक्कारदाराचे विनंतीनुसार विभागीय सहनिबंधक अमरावती यानी १७ मे ही द्वितिय सुनावणीची तारिख मुक्रर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here