आकोट, संजय आठवले
अकोला जिल्ह्यातील नगर पालीकांचे निवडणूकी संदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यानी नागरीकाना सुचित करुन प्रभाग रचनेबाबत सुचना व हरकतींसाठी १० मे ते १४ मे हा कालावधी निवडणूक आयोगाने निर्धारीत केल्याची माहीती दिली आहे. त्यानुसार नागरीकानी पालीका प्रभाग रचनेबाबत आपल्या सूचना व हरकती विहित कालावधीत दाखल करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
या संदर्भात आपल्या आवाहनात जिल्हाधिकारी निमा अरोरा यानी म्हटले आहे कि, मा.राज्य निवडणुक आयोगाने अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापुर, मुर्तिजापुर
व तेल्हारा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दिनांक २२/०२/२०२२ रोजी प्रभाग | रचना कार्यक्रम निर्गमित केला होता. सदर कार्यक्रमानुसार आक्षेप व हरकतीचा कालावधी दिनांक १०/०३/२०२२ ते दिनांक १७/०३/२०२२ असा होता. मा. सर्वोच्च न्यायालयाने SLP क्र १९७५६/२०२१ मधील दिनांक ०४/०५/२०२२ च्या आदेशास अनुसरुन राज्य निवडणुक आयोगाच्या दिनांक १०/०३/२०२२ रोजी सुरु असलेल्या टप्प्यांपासून निवडणुकांची | कार्यवाही त्वरित सुरु करण्याचे निर्देश दिले असल्याचे मा. राज्य निवडणूक आयोगाने | दिनांक ०६/०५/२०२२ रोजीचे पत्रान्वये कळविले आहे. सोबतच पत्रासोबत जोडलेल्या परिशिष्ट २ ( ब वर्ग नगरपरिषद, अकोट, मुर्तिजापुर व बाळापुर) परिशिष्ट ३ (क वर्ग नगरपरिषद तेल्हारा) नुसार आक्षेप हरकतींच्या टप्प्यापासून सुधारित कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार अकोट, बाळापुर, मुर्तिजापुर व तेल्हारा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी याव्दारे सुचना देण्यात येते की, प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना दिनांक १० मे २०२२ ते दिनांक १४ मे २०२२ पर्यंत जिल्हाधिकारी अकोला विचारात घेतील.
मसुद्यास ज्या लोकांच्या काही हरकती असतील त्यांनी त्या हरकती सकारण मुख्याधिकारी नगरपरिषद अकोट, बाळापुर, मुर्तिजापुर व तेल्हारा यांचेकडे मंगळवार दिनांक १० मे २०२२ ते शनिवार दिनांक १४ मे २०२२ या कालावधीत (दुपारी ३.०० वाजेपर्यंत ) लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी विचारात • घेणार नाहीत. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्यांसाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
नगरपरिषदेच्या क्षेत्राच्या प्रभागांची सिमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद प्रशासन विभाग, संबंधित तहसिल कार्यालय व संबंधित नगरपरिषदेच्या कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद अकोट, बाळापुर, मर्तिजापुर व तेल्हारा यांचे वेबसाईटवर उपलब्ध राहतील..