अकोला जिल्हाधिकारी यांनी पातूरात घेतली आढावा बैठक…स्वाब गोळा करण्यासाठी शासनाच्या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे केले आव्हान…

अकोला येथून रेड झोन मधील अधिकारी कर्मचारी यांनी येणे-जाणे करू नये असे जिल्हा अधिकाऱ्यांचे निर्देश.

पातूर तालुक्यामध्ये आणि विशेषतः पातूर शहरामध्ये दिवसे दिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने अकोला जिल्हाधिकारी दिनांक २ जुलै २०२० ला त्यांनी पातूर तहसील कार्यालय नगरपरिषद कार्यालय येथे आढावा बैठक घेऊन वाढत्या कोरोनारुग्ण बाबत चिंता व्यक्त केली आहे पातुर तालुका आणि विशेषता पातुर शहरामध्ये कोरोना चा संसर्ग हळूहळू वाढू लागला असून.

त्याची कारणमीमांसा मागील अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये पातुर मधून अकोला मध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात जाणे झाले आहे या कालावधीमध्ये ईदआणि काही सण उत्सव झाले सद्यस्थितीत पातुरात १७ रुग्ण असून त्यामध्ये भविष्यात वाढ होऊ नये म्हणून ज्येष्ठ नागरिक,गर्भवती महिला ,जन्मनाऱ्या बाळांना कोरोणाचा संसर्ग होऊ नये म्हणून पातुरात डॉक्टरांची बैठक घेतली.

पातुर शहरांमधील आणि तालुक्यामधील सर्व लोकांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज असून ताप ,सर्दी ,खोकला, असल्यास त्याची तपासणी करून घ्यावी शहरात नागरिकांचे स्वाब घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे तर यापूर्वी स्वाब कलेक्शन करून नागरिकांना कवारण टाईन करण्याचा कुठलाही माणस नव्हता आणि यानंतर सुद्धा कवारन टाईनकरण्यात येणार नाही.

स्वाब कलेक्शन दिल्यानंतर पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर कवारण टाईन करण्यात येणार कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी तोंड आणिनाकावर मास्क किंवा रुमाल बांधावा कुणाशी बोलताना विना मासक बोलू नये म्हणून नागरिकांनी स्वाब कलेक्शनसाठी पुढे येण्याचे आवाहन केले यावेळी पातूर शहरामधील २० वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाचा निधी आहे.

मात्र जागा निश्चित झाली नाही कर्मचारी अधिकारी निवासी राहत नसून अकोला येथील प्रतिबंधित क्षेत्रामधून जानेयेनेकरीत असल्या च्या मुद्दा उपस्थित केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे सांगितले त्याचप्रमाणे शासकीय कर्मचारी यांना रेड झोन मधून येणे-जाणे करू नये याबाबत निर्देशदेणार असल्याचेपत्रकारांना बोलताना व्यक्त केले यावेळी पोलीस प्रशासन महसूल विभाग पंचायत समिती बँक प्रशासन नगरपरिषद मुख्याधिकारी नगर परिषद सदस्य नागरिक आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here