अकोल्यातील लकडगंज टिम्बर मार्केट मध्ये आग लागून चार दुकाने व तिने घरे जळून खाक…

अकोल्यातील माळीपुरा परिसरात लकडगंज टिम्बर मार्केट येथे आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली असून यात चार दुकाने जळून, तीन घरे खाक झाली आहेत. सदर आग पहाटे चार वाजताच्या सुमारास लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर ही आग विझविण्यात अग्निशमन दलाल यश आले असून, यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेत चार दुकाने व तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखोंचे नुकसान झाले. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. मात्र, अग्निशमन दलाच्या दिरंगाईमुळे आग विझवण्यास उशीर झाल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला. लक्कडगंज येथे लाकडाचे आणि बांबूचे साहित्य विक्री केले जातात.

या आगीत विदर्भ टिंबर, दुर्गेश टिंबर मर्चंट, डेहणकर टिंबर मार्ट, नूर अहेमद टिंबर मर्चंट ही चार दुकाने व तीन घरांचे मोठे नुकसान झाले असून या आगीत सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून मात्र,आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेत अग्निशमन विभागाचे तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, दरम्यान, घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here