अकोला जिल्हाधिकारी पोचल्या विटभट्ट्यांवर, पंचनाम्यानुसार निर्धारीत महसुलात केली ६० टक्क्यांची कपात, १० मार्चपर्यंत महसुल भरण्याची ताकीद…

आकोट – संजय आठवले

विटभट्ट्यांच्या महसुल वसुलीसाठी यांचे हजर राहण्याचे व राजकिय भाऊंच्या माणसापासुन वसुलीचा शुभारंभ होण्याचे महाव्हाईसने केलेले भाकित तंतोतंत खरे ठरले असुन अकोला जिल्हाधिकारी यानी विटभट्ट्यांची पाहणी करताना विटभट्टीधारकाना महसुल भरणा करण्याचे आवाहन केले. सोबतच पटवारी पंचनाम्यानुसार निर्धारीत महसुलाच्या रकमेतुन ६० टक्के रकमेची सुट देवून केवळ ४० टक्के रकम १० मार्चपर्यंंत वसुल करण्याचे आदेश दिले.

आकोट तालुक्यातील काही विटभट्टीधारकानी गत ८-१० वर्षांपासुन तर काहीनी चारपाच वर्षांपासुन महसुल भरणाच केलेला नाही. भरणा वसुलीसाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचा-याना एकतर कुण्यातरी राजकिय भाऊनी रोखले किःवा विटभट्टीधारकानी तरी वादावादी करुन परत पाठविले असे चित्र गत काही वर्षात तयार झाले असताना यंदा विटभट्ट्याःकडून महसुल वसुल करण्यासाठी स्वयं जिल्हाधिकारी अकोला निमा आरोरा ह्या जातीने वसूलीस्थळी हजर झाल्या.

त्यानी थकबाकीदारांची यादी तपासुन आपला मोर्चा नखेगाव येथिल दिलीप सुलताने यांचे विटभट्टीकडे वळविला. सुलताने हे आमदार रणधीरभाऊ सावरकरांचे निकटवर्तिय मानले जातात. त्यांचे विटभट्ट्यावर पोचल्यावर जिल्हाधिकारी यानी तिथे ऊपस्थित विटभाट्टीधारकाना थकबाकीसःदर्भात विचारणा करुन त्याना महसुवा भरण्याचे आवाहन केले. त्यावर पटवा-यानी चुकिच्या पद्धतीने महसुल आकारणी केल्याची कैफियत दिलीप सुलताने यानी मांडली.

आपल्या बोलण्याच्या पुष्ट्यर्थ त्यानी जिल्हाधिकारी याना विटा तयार करण्यासाठी लागणा-या सामुग्रिची माहिती दिली. विट तयार करण्यासाठी ४० टक्के माती आणि ६० टक्के आन्य सामुग्री ज्यामध्ये राख, लाकडाचा भुसा, बकास म्हणजे ऊसाच्या चिपाडाचा भुसा, तांदुळाच्या तुसाचा भुसा याचा वापर केला जातो. परंतु पंचनामा करताना पटवा-यानी संपूर्ण वाट केवळ मातीची असल्याचे गृहित धरुन महसुल निर्धारण केले आहे.

ही बाब लक्षात येताच जिल्हाधिकारी निमा आरोरा यानी विटाःवर ४० व विटभट्टीवर संग्रहीत मातीवर १०० टक्के महसुल आकारणी करण्याचे आदेश दिले. सोबतच कोरोना काळाचे भान ठेवून विटभट्टीधारकाना येत्या १० मार्चपर्यंत महसुल भरणा करण्याची ताकीद दिली आहे. असे न झाल्यास विटभट्ट्या सिलबंद करण्याचा ईशाराही दिला आहे.

अकोला आकोट मार्गालगतच्या विटभट्ट्यांवर पुढिल वर्षी कारवाई
अकोला आकोट मार्गाने चोहट्टा ते गांधीग्रामचे दरम्यान या मार्गालगतच विटभट्या ऊभारल्या आहेत. या मार्गाला खेटूनच काही विटभट्टीधारकानी पक्की बांधकामे करुन आरामगृहे उभी केली आहेत. या बेकायदेशिर प्रकाराने महामार्गाचे नियम मोडले जात असुन रहदारीलाही प्रचंड बाधा निर्माण होत असल्याबाबत जिल्हाधिकारी यानी तिव्र नापसंती व्यक्त केली. परंतु मागिल दोन वर्षाच्या कोरोना काळात विटभट्टीधारक आर्थिक अडचणीत आल्याने आकोट अकोला मार्गालगताच्या विटभट्ट्यांवर मानवतेच्या दृष्टिकोनातुन यंदा कारवाई करु नये.

मात्र पुढिल वर्षी रस्त्यालगत एकही विटभट्टी तथा पक्के बांधकाम दिसता कामा नये असे आदेश जिल्हाधिका-यानी तहसिलदार नालेश मडके याना दिले. विटभट्टीधारकाना हे माहित होण्यासाठी त्याना सुचनापत्रे देण्याची सुचनाही जिल्हाधाका-यानी केली. यामूळे विटभट्ट्यांचे प्रदुषण व वाहतुकीचा अडथळा संपून आकोट आकोला मार्ग सुरळीत व सुरक्षित होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. महसुल वसुली मोहिमेत अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे समवेत तहसिलदार निलेश मडके, तालुका कृषी आधिकारी शिःदे, मंडळ अधिकारी विशाल शेरेकर, अनिल ओईंबे तथा चोहोट्टा मंडळाचे सर्व तलाठी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here