Lockdown : अकोला शहर वाहतूक शाखेची ८ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई ३५० वाहने जप्त…

न्यूज डेस्क :- वाढता करोना प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने दिनांक 15/4/21 पासून संपूर्ण महाराष्ट्रात कडक लॉक डाऊन जारी केला, त्या अंतर्गत संचारबंदी लागू करून फक्त जीवनावश्यक वस्तूची दुकाने, मेडिकल वगळता सर्व आस्थापने बंद केली,जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुद्धा निर्धारित वेळेतच सुरू ठेवली.

कोरोनाचा वाढता संसर्ग कमी व्हावा व प्रादुर्भावाची चेन तुटावी ह्या उद्देशाने लागू केलेल्या ह्या लॉक डाऊन चा मूळ उद्देश लोकांची गर्दी कमी करणे हा असल्याने शासनाचा उद्देश सफल करण्यासाठी पोलीस विभागावर महत्वाची जबाबदारी असल्याने लॉक डाऊन यशस्वी करण्यासाठी अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहनधारंकावर कारवाई केली.तसेच त्यांनी अकोला शहर वाहतूक शाखेला सुद्धा कारवाईचे निर्देश दिले.

त्या अनुषंगाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ यांनी आपल्या सहकाऱ्यासह रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक तसेच वाहन जप्तीची धडक कारवाई केली, त्या अंतर्गत दिनांक 15/4/21 ते 30/4/21 ह्या लॉक डाऊन च्या पहिल्या चरणात जवळपास 8 हजार वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करून साडे पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला व काहीही कारण नसतांना रस्त्यावर आढळून येणारी जवळपास 350 वाहने शहरातील विविध पोलीस स्टेशन मध्ये जप्त करून सदर वाहन चालकांवर संचारबंदी नियम भंग व इतर गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशा प्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व अंमलदार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here