अकोला | जात पडताळणी कार्यालयातील कंत्राटी कामगारला ५ हजाराची लाच घेतांना ACB ने रंगेहात पकडले…

फोटो सौजन्य गुगल

अकोला जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयातील कंत्राटी कामगारला ५ हजाराची लाच घेतांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. अनिल कचुरुआप्पा दयाळ, वय-25 वर्षे असे लाच घेणाऱ्या कर्मचार्याचे नाव असून तो अकोला जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय, संशोधक सहाय्यक (कंत्राटी) कार्यरत आहे.

आज दिनांक 22/10/2021 रोजी यातील तक्रारदार व त्यांची पत्नी यांचे जात पडताळणी चे प्रकरण त्रुटी मध्ये न काढता लवकर पडताळणी करून देण्याकरिता 6,000/- रुपयाची मागणी करून तडजोडी अंती 5,000/- रुपये लाच स्वीकारली ईलोसे यांना रंगेहात पकडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे.

सदर कारवाई श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती, श्री.अरूण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत विभाग, अमरावती ,पोलीस उप अधीक्षक – श्री.उत्तम नामवाडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्या मार्गदर्शनात झाली…

कारवाई पथक–श्री.नरेश रणधीर पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.अकोला, पो.अंम अरुण इंगोले. राहुल इंगळे, प्रदीप गावंडे, निलेश शेगोकार, सर्व ला.प्र.वि.अकोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here