मोदी सरकारच्या शेतकरी,कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेचा आक्रोश…

चारोटी महामार्ग अर्धातास रोखला
अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष काम्रेड अशोक ढवळे यांच्या नेतृत्वात.

डहाणू – जितेंद्र पाटील

केंद्रासरकार च्या शेतकरी, कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात आज,ता,25 रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी नाक्यावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील शेतकरी,कामगार यांनी एल्गार पुकारला,जवळपास पाऊण तास महामार्ग रोखला होता. यात तलासरी व डहाणू तालुक्यातील तीन ते चार हजार नागरिक सहभागी झाले होते.

अखिल भारतीय किसान सभा, शेतकरी, कामगारांनी पुकारलेले हे देशव्यापी प्रतिकार आंदोलन आज एकाच दिवशी सुरू आहे.सकाळी 11 वाजल्या पासून चारोटी महामार्गावर बंदोबस्त साठी एस. आर.पी. पोलीस हजर झाले.12 वाजे पासून शेतकरी, कामगार लालबावटे घेऊन मोठ्या संख्येने जमू लागले.

हातामध्ये बॅनर ,पोस्टर घेऊन घोषणाबाजी करीत अनेक महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.कोरोनाचा प्रादुर्भाव असून देखील नागरिकांची उपस्थित जास्त होती.
घोषणाबाजी करताना मुख्य मागण्या म्हणजे मोदी सरकारच्या धोरणाविरोधात निषेध, केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कॉर्पोरेट धार्जिणे कायदे रद्द करा.

खावटी चे दोन हजार रु महिलांच्या खात्यात जमा करा. या मागण्यांसाठी हे आंदोलन केले. या वेळी अखिल भारतीय भारतीय सभे चे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्र. अशोक ढवळे, डहाणू चे आमदार विनोद निकोले व अनेक कार्यकर्ते हजर होते.

मोदी सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत,या सरकारने पार्लमेंट मध्ये शेतकरी, कामगार विरोधी विधयेक ताना शाही पद्धतीने पास करून घेतले.त्याचा निषेध करण्या साठी तलासरी व डहाणू तालुक्यातील हजारोंच्या संख्येने लाल बावटा ला मानणारे लोक रास्ता रोको मध्ये सहभागी झाले आहेत.

प्रत्येक तालुक्यात किसान सभेच्या वतीने 25 जिल्ह्यात देश भरात एकाच वेळेस हे आंदोलन होत आहे. शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द करा. या साठी मोदी सरकारच्या निषेधार्थ आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत कॉम्र. अशोक ढवळे-राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here