अजित पवारांचा एकेरी उल्लेख…पोलिसांची धरपकड तर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न;पोलिसांच्या गाडीतून नेताना गाडीतून पडून एक शेतकरी गंभीर…

चाकण ( पुणे ) – ‘अरे इथून मागे तू गुरं वळत होतास ना. आम्ही पण गुरच वळतोय…बोलण्याची काही अक्कल आहे का तुला. अर्थमंत्री आहेस ना?…पाठीमागं मावळत सहा-सात मारलीस तू. इथं पण तुला मावळ करण्याचा आहे काय’, असा सवाल करीत भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घणाघात केला.

गेली ३० वर्षापासून प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या पुनर्वसन करण्यासाठी आंदोलन करत आहेत. भामा आसखेड धरणाचे पाणी जलवाहिनीद्वारे पुण्याला नेण्याचे काम बंद करावे, या मागणीसाठी भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जलवाहिनीवर बसून जेलभरो आंदोलन केलं.

यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. आंदोलक शेतकऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली. यावेळी एका शेतकऱ्यानं थेट अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी गाडीत नेताना गाडीतून पडून एक शेतकरी गंभीर जखमी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here