पन्नास किलो पोते घेऊन धावण्याच्या स्पर्धेत अजित पडळकर प्रथम दगडू मासाळ द्वितीय तर सुब्राव सरगर तृतीय…

सांगली – ज्योती मोरे

सांगली वसंतदादा मार्केट यार्डतील सर्व हमाल तोलाईदार,व सर्व गाडीवान यांच्या वतीने सांगलीतील वसंतदादा मार्केट येथे दिवाळीनिमित्त 50 किलोचे पोते पाठीवर घेऊन धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अजित पडळकर प्रथम, दगडू मासाळ व्दितीय, सुब्राव सलगर तृतीय ,भारत खांडेकर चौथा असे नंबर काढण्यात आले. काँग्रेसचे युवा नेते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक मनोज सलगर व नगरसेवक अभिजीत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर, सांगली जिल्हा हमाल पंचायत जनरल सेक्रेटरी कामगार नेते विकास मगदूम, हमाल पंचायत सहकारी पतपेढीचे सचिव दिलीप ओलेकर, सांगली जिल्हा हमाल पंचायत चे उपाध्यक्ष ,राजाराम बंडगर,रामचंद्र बंडगर, प्रल्हाद होनमाने, किरण रुपनर आदी उपस्थित होते.

यावेळी शिवाजी गडदे यांच्याकडून पाच फुटी ढाल व लक्ष्मण पांडुरंग खरात यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे बक्षीस रु.11111/_देण्यात आले .तसेच विकास हाके यांच्याकडून चार फुटी ढाल आणि रंगराव काळेल यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले .आदित्य हाके यांच्या कडून तीन फुटाची ढाल, व श्री दत्त समर्थ ट्रान्सपोर्ट हमाल स्टाफ कडून तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.

विकास सुखदेव देवकाते यांच्याकडून चौथ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. व मारुती काळेल ,संतोष शेंडगे, बबलू काळेल, राजाराम माने, संदीप बंडगर, यांच्याकडून बक्षीस देण्यात आले. यावेळी पंच म्हणून नेताजी शेंडगे, गणपती हक्के ,विकास देवकते, यांनी काम पाहिले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसापासून पोते घेऊन धावण्याच्या स्पर्धा थांबल्या होत्या.

त्या पुन्हा चालू झाल्याने स्पर्धकांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण होते. ढोल ताश्याच्या गजरात स्पर्धा पार पडल्या. यामुळे स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. वसंतदादा मार्केट यार्ड या ठिकाणी सर्व हमाल तोलाईदार व गाडीवान यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला 50 किलो पोती घेऊन धावण्याच्या स्पर्धात अजित पडळकर यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविल्या बदल विशाल पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.यावेळी विकास मगदूम, मनोज सरगर,बाळासाहेब बंडगर, अभिजित भोसले आदी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here