अहमदनगर पोलीस कर्मचारी समाधान भुतेकर यांची आत्महत्या !…भुतेकर हे बुलढाणा जिल्हातील रहिवासी

फोटो- सोशल मिडिया

न्यूज डेस्क – कालच अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. समाधान अच्युतराव भुतेकर (वय 33 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

समाधान भुतेकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. विशेष म्हणजे नुकतीच त्यांच्या बदलीचे आदेश आले होते, मात्र नव्या ठिकाणी रुजू होण्यापूर्वीच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

पोलिस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मात्र भुतेकर यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. समाधान भुतेकर यांचे मूळ गाव बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात आहे. ते नगर जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते.

पाच वर्षांपूर्वी भुतेकर यांची अहमदनगर शहर वाहतूक शाखेत नियुक्ती झाली होती. शहर वाहतूक शाखेतील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची नुकतीच कोतवाली पोलिस ठाण्यात बदली झाली होती. शहर वाहतूक शाखेने त्यांना पाच ऑगस्टला निरोपही दिला होता. नव्या पोलीस स्टेशनला रुजू होण्याआधीच गळफास त्यांनी गळफास घेतला.

समाधान अच्युतराव भुतेकर लवकरच कोतवाली पोलिस ठाण्यात रुजू होणार होते. मात्र गुरुवारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here