शेतावर साजरा केला कृषि दिवस…

राजू कापसे…रामटेक

रामटेक तालूक्यातील शिवनी भोंडकी येथे कृषि विभागाच्या कृषि सहाय्यक सौ.,यु.डी.पुडके यांच्या मार्गदर्शनार्थ कृषि दिन साजरा करण्यात आला. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.

महाराष्ट्र शासनाने कृषि दिन हा 1 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (1 जुलै) ‘महाराष्ट्र कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.कृषि दिन साजरा करतांनी कृषि सहाय्यक यांनी कृषि विभागामार्फत शेतीविषयक माहीती दिली.तसेच शेतावर प्रात्यक्षिके दाखविले….

यावेळी शिवनी येथील सरपंचा शालू उईके पो.पाटिल गणेश बडवाईक तंटामुक्ती अध्यक्ष रामु मेहर मा,जी सरपंच हेमराज बडवाईक,गुरूदास शेंडे,महादेव पाटिल,विष्णू गभणे विशेष असे की पुरूषापेक्षा गावातील महीलांचा अधिक उत्सुफुर्त प्रतीसाद दिसून आला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here