कृषी कायदे रद्द; शेतकरी एकजुटीचा विजय – बच्चू कडू…

नवी दिल्ली – केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः याबाबत घोषणा केली. त्यामुळे लवकरच संसदेतही हे कायदे रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी दिली. मोदींच्या या घोषणेनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री बच्चू कडू म्हणाले की, मोदीजींनी तीन कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला हा शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. प्रचंड बलिदानानंतर, जगातलं सर्वात जास्त वेळ चालणारं हे आंदोलन होतं. खासकरुन पंजाबच्या शेतकऱ्यांना मानाचा सलाम करतो, मानाचा मुजरा करतो. मी सुद्धा दुचाकीवरुन या आंदोलनात सहभागी झालो होतो. मोदी सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडलं आहे.

ही जी तानाशाही आहे ती शेतकऱ्यांच्या एकजुटीने पार मोडून काढली आहे. याचे परिणाम येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटतील हे भय मोदी सरकारला आलं आणि त्यातून हा निर्णय झाला. राजकीयदृष्ट्या घेतला असला तरी तो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे, त्यामुळे मी मोदी सरकारचे आभार मानतो
येत्या काळात शेतकऱ्यांची लूट थांबवावी. योजनेतून द्यायचं आणि धोरणातून लुटायचं हे सरकारनं बंद केलं पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here