जिल्ह्यातील १२७३ ग्राहकांचे कृषी वीजबिल झाले कोरे…

थकबाकीदार शेतकऱ्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानात साधली संधी

अमरावती, दि.२५ फेब्रुवारी २०२१

शासन तसेच महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानाने शेतकऱ्यांना कृषीपंपाच्या थकबाकीत भरघोस सवलत देत थकबाकीमुक्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधिचा फायदा घेत जिल्ह्यातील १२७३ शेतकऱ्यांनी आपले कृषी बिल कोरे करून घेतले आहे. 

या अभियानाअंतर्गत ७० टक्क्यापर्यंत सवलतीचा लाभ घेतलेल्या  जिल्ह्यातील १२७३  शेतकऱ्यांमध्ये प्रामुख्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील व मोर्शी तालुक्यातील प्रत्येकी १८२ शेतकऱ्यांचा सहभाग आहे,याच सोबत शेंदुरजना घाट ९५, बडनेरा ८८,वरूड ११८,भातकुली ७५, धामणगाव येथील ८८,अचलपुर ८०,अंजनगाव २२,चिखलधरा ३०,दर्यापूर ६,धारणी १५, चांदुरबाजार ७३,चांदुर रेल्वे  येथील ६२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

 महावितरणचे महा कृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे.

तसेच ५ वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे

तीन वर्षासाठी असलेल्या या अभियानात ज्या ग्राहकांनी  एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम भरणेही गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here