कागल तालुक्यातील गोरंबे येथे कृषी जागरूकता कार्यक्रम संपन्न…

राहुल मेस्त्री

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीअंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालयातील व कराडची कृषिकन्या राजश्री मारुती कांबळे हिने कृषी औद्योगिक कार्यानुभव योजनेंतर्गत दूधवाढीसाठी पोषक चारा प्रक्रिया,जीवामृत प्रक्रिया,पिकांचे कीड व्यवस्थापन,माती परीक्षण या विषयासंबंधी गावातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.

यामध्ये राजश्री कांबळे यांनी चारा प्रकियेमुळे चाऱ्याची पचनियता वाढवण्यासाठी मदत होते.तसेच जनावरांचे आरोग्य चांगले राहते व दुधामध्ये वाढ होते.तसेच जीवामृत प्रकियेमध्ये जीवामृत हे बुरशीनाशक व विषाणूनाशक आहे.जीवामृत फवारणीमुळे बुरशी व विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येतो.याबाबत माहिती दिली.

यावेळी सरपंच सौ.सुमन विष्णुपंत गायकवाड, उपसरपंच सिद्राम ढोले,तंटामुक्त अध्यक्ष साताप्पा दावणे,माजी सरपंच कृष्णात पाटील, माजी सरपंच शंकर सावंत,डॉ.दिलीप सावंत, माजी सरपंच दत्तात्रय दंडवते,माजी सरपंच पांडुरंग पाटील,ग्रामसेविका सौ.अनिता कांबळे, रतन कांबळे,दगडू चौगुले यांच्यासह ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.राजश्रीला प्राचार्य डॉ.आर.आर.सूर्यवंशी, डॉ.उल्हास बोटले,डॉ.धनंजय नावडकर,डॉ.स्नेहल जुकटे, डॉ.आनंद चवई ,डॉ.कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here