भन्ते सत्यपाल चार तत्वात विलीन अग्नी संस्कार संपन्न…

शरद नागदेवे

नागपूर -नागपुरातील भन्ते सत्यपाल महाथेरो यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी कन्हान नदीवरील हरदास घाटावर अग्नीसंस्कार करण्यात आला. त्यामुळे सत्यपाल हे चार महाभुतात (पृथ्वी,अग्नी, जल, वायू) विलीन झाले.त्यांचे गुरवारी २१ जानेवारी रोजी सांयकाळी निधन झाले होते.भन्ते सत्यपाल यांचा विश्वकर्मा नगरातील भिमदोय मंडळ बुद्ध विहार येथे निवास होते.

शुक्रवारी दुपारी एक वाजता भन्ते सत्यशील महाथेरो (79) यांची अंतिम यात्रा विश्वकर्मा नगरातील धमोदय बुद्ध विहार मधून निघून मेडिकल चौक, इंदोरा चौक, ऑटोमॅटिव्ह चौक, कामठी रोड मार्गे कन्हान नदीवरील हरदास घाटावर पोहोचल्यावर दु 2 वा तिथे त्यांच्या पार्थिवावर भिक्खू व हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत अग्नीसंस्कार करण्यात आला.

नागपुरातून निघालेल्या सुसज्ज धम्मरथावर भन्ते सत्यपाल यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. सोबतच अनेक चारचाकी वाहने बस, ट्रक, ट्रॅव्हल, कार अश्या ताफ्याने त्यांना पोचवण्यात आले.

अखिल भारतीय भिक्खू संघाच्या अनेक महास्थविरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. याप्रसंगी मुंबई, दिल्ली, औरंगाबाद आधी देशाच्या विविध ठिकाणावरून व राज्यातील सर्वच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भिक्खू संघ उपस्थित झाला होता.

त्यात प्रामुख्याने महास्थविर महापंत, भन्ते प्रियदर्शी, भन्ते शीलरक्षित, भन्ते नागदीपंकर, भन्ते राहुलबोधी, भन्ते आनंद, भन्ते धम्मोदय, भन्ते धम्मसारथी, डॉ मेतानंद, भन्ते अभयरक्षित, भन्ते शीलरत्न, धम्मगुनानंद, भन्ते शीलरक्षित, भन्ते धम्मप्रिय, भन्ते प्रज्ञानंद, तसेच भिक्षुणी धम्मशिला, संघप्रिया, धम्मसुधा, गौतमी आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.

शिवाय नागपुरातील विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात प्रामुख्याने समता सैनिक दलाचे रितेश गायमुखे, ओमप्रकाश मेंढे, बसपाचे उत्तम शेवडे, गौतम पाटील, राजेश फुलझेले, शरद नागदेवे,सामाजिक कार्यकर्ते संजय सायरे, सुरेश तामगाडगे, धनराज हाडके, राजू कांबळे, दिनेश ढाकणे, प्रीतम खडतकर, रमेश पाटील, नरेश गजभिये, बुद्ध विहार कमिटीच्या तारा पाटील, मुक्ता गावंडे, वंदना ढाकणे, ममता साखरे, सुनीता गणवीर, जोशना कांबळे, माया धनविजय, पुष्पांजली गजभिये, कल्पना गडपायले आदी शेकडोंच्या उपस्थित कार्यकर्ते व उपासक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here