मौदा रोड वरील राईस मिलच्या होणार्‍या विविध त्रासामुळे प्रहारचे आंदोलन…

रामटेक – राजु कापसे

आज नगरधन ते नेरला पर्यंत रामटेक मौदा मार्गावरील राईस मिल नियम बाह्य पद्धतीनें होत असलेले प्रदूषण चुकीचा पद्धतीनें वाटेल तेथे राख फेकणे , राईस मिल मधून उडणारा कोंडा , रस्त्यावर जड वाहने, ट्रक उभे करणे , राईस मिल मधून निघणारे रसायन युक्त पाणी शेतकऱ्यांचा  शेतात सोडणे, या सर्व गैर प्रकारामुळे या रस्त्याने जाणारे, येणारे नागरीक ,शेतकरी ,

तसेच नगरधन, नंदापुरी , नेरला, हमलापुरी, आजणी  या गावातील जनतेला मोठ्यप्रमाणावर या राख युक्त धूर, कोंडा व अस्त व्यस्त उभे राहत असलेल्या वाहनामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या विषयी  तहसीलदार  रामटेक यांना दिनांक १२ जानेवारी ला प्रहार संघटने तर्फे निवेदन देऊन कार्यवाही ची मागणी केली होती

माञ यावर काहीही कार्यवाही न झाल्याने आज  नगरधन हमला पुरी फाटा येथे प्रहारच्या वतीने एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक कामगार रस्त्याने प्रवास करणारे नागरिक यांनी सहभाग घेतला अखेर रामटेक उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते आणि तहसीलदार  बाळासाहेब मस्के यांनी दिनांक २५ जानेवारी रोजी तहसील कार्यालय रामटेक येथे संबंधित राईस मिल धारक,

प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक यांची संयुक्त बैठक लावून हा विषय मार्गी लावण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे एक दिवसीय ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले मात्र या बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार  नागपूर जिल्हा प्रमुख रमेश कारामोरे यांनी दिला यावेळी या आंदोलनात नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रहार संघटना रमेश कारामोरे,सरपंच नगरधन प्रशांत कामडी,

उपसरपंच नगरधन अनिल मुटकुरे, माजी उपसरपंच नंदापुरी मनोज नौकरकर,ग्राम पंचायत सदस्य नंदापुरी रेवणात मदनकर,जी.प.सर्कल प्रमुख प्रहार राहुल बावणे ,प्रहार शाखा प्रमुख चाचेर अंकित कडु,पं.स.सर्कल प्रमुख नगरधन अनिल येळणे,युवा अध्यक्ष रामटेक प्रयास ठवरे, कामगार प्रतीनिधी सूर्यलक्ष्मी कॉटन मिल अशोक गंगाभोर

,कामगार प्रतीनिधी सूर्यलक्ष्मी कॉटन मिल सचिन भिवगडे,कामगार प्रतीनिधी सूर्यलक्ष्मी कॉटन मिल संजय अजबैले,कामगार प्रतीनिधी सूर्यलक्ष्मी कॉटन मिल दिपक वासनिक,प्रहार संघटना नगरधन विवेक भाऊ नौकरकर, अमन गायधने,रणवीर वाघमारे,करण चवरे,रामदास बावनकुळे,राजेंद्र बुरबांदे,मोतीराम खानकुळेज्ञानेश्वर हटवार,देवराव मचाळे,कृष्णा चाफले,गंगाधर चाफले,योगेश हटवार,गणेश नौकरकार हे प्रामुख्याने उपस्थीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here