नागपुरात लता मंगेशकर हाँस्पिटलच्या २०० परिचारिकांचे काम बंद आंदोलन बेमुदत आंदोलनाचा पहिला दिवस…

नागपूर – शरद नागदेवे

एन.के.पी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हाँस्पिटल मँनेजमेंटच्या कर्मचाच्यावरील अन्याय -अत्याचार,दडपशाही व शोषणा विरोधात कामगार नेते अरुण गाडे यांचे नेतृत्वात लता मंगेशकर हाँस्पिटल हिंगणा नागपूर येथे नर्सेस व कर्मचा-यांचे काम बद आंदोलन,

बेमुदत आंदोलन आज शनिवार दि.10/7/2021 ला सकाळी लता मंगेशकर हाँस्पिटल गेटसमोर 200 परिचारिकांना मँनेजमेंटच्या दडपशाही व हुकमशाहीविरोधात घोषणा देऊन निदर्शनै केली,पोलीसांनी प्रथम दडपशाहीचा अवलंब केला .परिसराला छावनीचे स्वरुप दिले.पंरतु तरीही आंदोलकांनी पोलीसांची भिती न बाळगता निर्भयपणे आंदोलन करुन मँनेजमेंटला आंदोलन स्थळी येण्यास व चर्चेस भाग पाडले.

मँनेजमेंटकडून 5वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर सेवेत कयम करण्याचे आश्वासन देऊन 8-8 वर्ष झाली असतांना सुध्दा तुटपुंजे वेतन देऊन आर्थिक शोषण केल्या जात आहे. सरकार कडून वेतन वईतर सुविधा मिळत असतांना कर्मचा-यांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे.वार्षिक वेतनवाढ देण्यात येत नाही.हक्काच्या सुट्या मिळत नाही.

सुट्याचे वेतन कपात केली जात आहे. ही हुकुमशाही आहे.शासनाचे सर्व नियम मँनेजमेंटला बंधनकारक आहेत,सरकारी नियमांची अवहेलना करण्यात येते.कायदा वा सुरक्षा रक्षकासोबत संगनमत करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्नकरण्यात येत आहे ,ही गभीर बाब आहे. निषेधार्थ आहे. कर्मचा-याना 12-12 तास ड्युटी करुन ही अपमान सहन करावा लागतो.

मानसिक अत्याचार केला जातो.वेठबिगारासारखे वागणूक दिली जात आहे.मागण्याबाबत निवेदन दिले असता “यहा युनियनबाजी नही चलेगी ,हम बोलेगे वही कायदा.
अश्या प्रकारची दडपशाही केली जात आहे.

ज्यांच्या भरवशावर हाँस्पिटल चालते त्यांचेवरच अन्याय केला जात आहे.ज्या परिचारिकां पूढाकार घेतात त्यांना टार्चर करुन मानसिक छळ केल्या जातआहे.या अन्याय अत्याचार, दडपशाही व शोषण विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.खालील मागण्या पूर्ण होईपर्यत आंदोलन करण्यात येईल.
मागण्या…
1)संघटनेच्या महिला नेत्यांची सूडबुध्दीने केलेली बदली तात्काळ रद्द करावी.
2)ज्यांची 5वर्ष सेवा पूर्ण झाली त्यांना सेवेत कायम करावे.
3)नियमाप्रमाणे वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी, 4)नियमाप्रमाणे सुट्या देण्यात याव्या, 5)समान काम समान वेतन लागू करावे. 6)मानसिकच छळ करणा-या रिता जाँन व छाया पाँल यांचेवर गून्हा दाखल करावा, गून्हे दाखल करुन त्यांना बडतर्फ करावे या मागणी साठी कास्ट्राईब नर्सेस संघटने द्वारा दि.10/7/2021 पासून एन केपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाच्या गेटवरधरणे व निदर्शने करुन घोषणा देण्यात आल्या .मँनेजमेंट सोबत झालेल्या चर्चेनुससार मागण्या मान्य करण्यासाठी 10दिवसाचा वेळ मागितला तसे लिखित स्वरुपात दिले.पंरतु मागण्या मान्य होईपर्यत आंदोलन सुरुच राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here