रासपच्या वतीने रविवारी सोलापूर येथे ओबीसी आरक्षणासाठी जेलभरो आंदोलन – ज्ञानेश्वर सलगर…

कुर्डुवाडी :- राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेवजी जानकर यांच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी रविवारी सकाळी 10.00 वा रास्ता रोको आंदोलन करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावर रविवार दिनांक 04 जुलै रोजी सकाळी दहा वाजता पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर ( माऊली) सलगर यांच्या नेतृत्वाखाली ़आणी सोलापूर जिल्हा मा. अध्यक्ष सुनिल बंडगर, पंढरपूर विभागाचे मा. जिल्हा अध्यक्ष आबा मोटे बशीर काझी- यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे . महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले.

याकामी सरकारने आवश्यक न्यायालयीन बाबींची पुर्तता केली नाही. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण तीन अटींची पूर्तता करण्यापर्यंत स्थगित केले. ओबीसी सहित सर्वच घटकांच्या आरक्षण विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा प्रभारी रणजित सूळ यांनी केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here