जिल्ह्यातील घोषित ग्रामपंचायत आरक्षण संदर्भात ॲड बाळासाहेब आंबेडकर यांची जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा…

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे ११ डिसेंबर २०२० नुसार घोषित केलेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे. घोषित केलेले आरक्षण कुठल्याही परिस्थितीत रद्द करण्यात येउ नयेत.

याकरिता आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी माननीय जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र पापळकर यांची चर्चा केली व जिल्हाधिकारी यांनी देखील घोषित केलेल्या आरक्षणा संदर्भात शासनाचे मत घेउन घोषित आरक्षणा मध्ये बदल होणार नाही.

असे आश्वाशित केले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्री संजय खडसे, तहसिलदार श्री विजय लोखंडे प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, ॲड संतोष रहाटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई, युवानेता पराग गवई, संतोष अग्रवाल या महत्वपुर्ण बैठकीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here