मोकाट कुत्र्यांच्या अधिकारांसाठी लढण्याऱ्या RTI कार्यकर्त्या ऍड.अंकिता शहा यांना लकडगंज पोलीस ठाण्यात मारहाण…पाहा व्हिडीओ

नागपूर – शरद नागदेवे

मोकाट कुत्र्यांच्या अधिकारांसाठी लढण्याऱ्या व माहिती अधिकार कार्यकर्ता ऍड.अंकिता शाह यांना लकडगंज ठाण्यात मारहाण करण्याचा धक्कादायक व्हिडीओ पुढे आला.व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर वायरल झाला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता शाह तुलसी अपार्टमेंट, टेलिफोन चौकात राहतात.मोकाट कुत्र्यांचा अधिकारांसाठी ते अनेक वर्षापासून लढा देत आहेत.कोरोनामुळे देशात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मोकाट कुत्र्यांना अन्न व पाणी देण्याची मोठी समस्या निर्माण झाली.

त्यावेळी अंकिता शाह यांनी आपल्या बिल्डिंगच्या‌ समोर रस्त्याचा कडेला कुत्र्यांसाठी एक पात्र ठेवले.या पात्रात कुत्र्यांसाठी अन्न व पाणी ठेवत होत्या.२४ मार्च दुपारी १ वाजता अंकिता आपल्या पती‌सह अन्न व पाणी कुत्र्यांना देण्याकरिता गेले असता इमारती मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने यांनी पात्राला लाथ मारली.

२५ मार्च २०२० ला संध्याकाळी ७:३० ला असाच प्रकार घडल्याने त्या लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या होत्या.त्यांचा पोलीस ठाण्यात पोलीसांन सोबत वादविवाद झाला.पोलीसांनी अंकिताला मारहाण केली.याविरूध्द अंकितांनी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली.तसेच माहितिच्या अधिकारात पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली.

Source – social media

प्रथम पोलिसांनी अंकिताला नकार दिला.माहितीच्या अधिकारात अपील मध्ये गेल्यानंतर उपायुक्तांनी फुटेज देणार्यांचे आदेश दिले.अंकिता शाह यांना रविवारी हे फुटेज मीळाले.त्यानंतर ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले असता उलटसुलट चर्चाला उधान आले.

अंकिता यांनी गुहमंत्री अनिल देशमुख,पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्तांकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, पोलीस निरीक्षक भावेश कावरे व संबंधीत पोलीस शिपायांची तक्रार केली.त्यांचावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here