देवलापार सह नऊ ग्रा.प.वर प्रशासक…

रामटेक – रामटेक येथिल प.स. अतर्गत नऊ ग्रा.प. च्या कार्यभार सप्टेंबर महिण्यात संपल्यामुळे या ग्रा.प.वर प्रशासक ची नियुक्ती करण्यात आलेली आहे.त्यामुळे आता ग्रा.प. चा आता कार्यभार सुरळीत कार्यान्वित होण्यास वाव मिळणार आहे.

दि.३० सप्टेंबर ला खालील प्रमाणे ग्रा.प. कार्यभार संपुष्टात आलेला आहे.तेथे प्रशासक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी सामान्य एस.एस.हुद्दार -मानापूर,किरणापूर,  विस्तार अधिकारी सामान्य राजेश जगणे -चिचाळा, शिवनी ( भोडकी) विस्तार अधिकारी पंचायत गजानन चव्हाण-पचाळा, खुमारी, आरोग्य पर्यवेक्षकआर.एल. कुबडे- पथरई दाहोदा आणि विस्तार अधिकारी कृृषी प्रभाकर चन्ने यांची ग्रा.प. देवलापार येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

सदर नियुक्ती मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्या आदेशान्वये खंडविकास अधिकारी  प्रदिप बमनोटे यांनी संबधीध अधिकारी यांनी ग्रा.प. प्रशासक अधिकारी म्हणून कार्यभार सांभावे,असे आदेश निर्गमित केलेले आहे. सदर ग्रा.प. चा कार्यभार हा संपलेला आहे.कोरोणा चा पार्श्र्वभुमीवर या ग्रा.प.चा निवडणूका पुढे ढकलण्यात आलेला आहे.

त्यामुळे उपरोक्त ग्रा.प.वर प्रशासनामधूच प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहे. राज्यातील सरकारने ग्रा.प. वर सामाजिक कार्यकर्त्यांमधून प्रशासकाची नेमणूक करावी ,असा डाव रचलेला होता.परंतू त्याला प्रखर विरोध झाल्याने सदर निर्णय मागे घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here