कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुतन प्रशासकीय संचालकाचा सत्कार…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंडळाची मुदत संपल्याने येथे नुकतेच प्रशासकीय संचालक बोर्डाची नियुक्ती करण्यात आली आहे. नुतन प्रशासकीय संचालकाचा माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य विनायकराव पाटील यांनी नुकताच नुतन संचालक शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख बालाजी रेड्डी, शिवसेनेचे शहरप्रमुख भारत सांगविकर

शिवसेनेचे सर्कल प्रमुख माऊली देवकते या संचालकाचा सत्कार करून शुभेच्छा यावेळी दिल्या. सदरील सत्कार सोहळ्यास माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश ढाकणे, भाजपचे युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अमित रेड्डी, राजकुमार खंदाडे, गोविंद गिरी, निळकंठ पाटील, बालाजी काळे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here