भाडयाच्या इमारतीत चालत असलेल्या जि प शाळांचे समायोजन तूर्त स्थगित करू – शिक्षण सभापती संजय बेळगे…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यातील भाड्याच्या इमारतीत चालणाऱ्या जिल्हा परिषद शाळातील समायोजन इतर शाळेत करणार असल्याचे पत्र निघताच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण सभापती संजय बेळगे यांची भेट घेतली असता भाडयाच्या इमारतीत चालत असलेल्या जि प शाळांचे समायोजन तूर्त स्थगित करू असे आश्वासन शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली 25 सप्टेंबर रोजी म.रा. शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षण सभापती संजय बेळगे, व जी.प. अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

नांदेड जिल्ह्यातील भाडयाच्या इमारतीत चालणाऱ्या जि.प.शाळांचे समायोजन इतर शाळेत करणार असे पत्र निघाले होते , त्या अनुषंगाने सदर शाळा इतर ठिकाणी समायोजन केल्यास तेथील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची आबाळ होईल.

मुले शिक्षणापासून वंचित राहतील ,शहरात इंग्रजी शाळांचे पेव खुप प्रमाणात आहे, पण मोल मजुरी करणारे, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांना परिसरातील जिल्हा परिषद शाळा हाच पर्याय आहे, कारण मुलांना ने आण करण्यासाठी पालक घरी नसतात आणि सोबतच शिक्षकाच्या समायोजनाचा ही प्रश्न निर्माण होणार आहे.

निवेदनात नमूद केल्या प्रमाणे सर्व बाबींवर शिक्षण सभापती यांच्या सोबत शिक्षक नेते तथा परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे ,संजय कोठाळे , मराठवाडा प्रमुख यांची आणि शिष्टमंडळाची चर्चा झाली तेव्हा सभापती संजय बेळगे यांनी सदर विषय तूर्त स्थगित करू असे आश्वासन दिले.

जि प अध्यक्ष सौ मंगारानी आंबुलगेकर यांनी ही शिक्षण अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून मुलाच्या हितासाठी योग्य निर्णय घेऊ असे आश्वासित केले.या शिष्टमंडळात शिक्षक नेते मधुकर उन्हाळे, सुरेश दंडवते, संजय कोठाळे,

विठ्ठल ताकबिडे,डी एम पांडागळे,बालाजी पांपटवार जिल्हा, सिद्धेश्वर मठपती, गौतम कसबे,बाळासाहेब मटके, धोंडीराज मुस्तापुरे, मुंडकर सर,सुधाकर वजिरगावे या सह अनेक शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here