दिलासादायक! नागपूर जिल्ह्यात ८१ नविन कोरोना बाधितांची भर…५ कोरोना बाधितांचा मुत्यू…३२२ रूग्ण कोरोनामुक्त…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर जिल्ह्यात बुधवार दि.९/६/२०२१ रोजी १०,६३५ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. यामध्ये ८१ रूग्ण कोरोनाबाधित आढळले असून शहरातील ४२ व ग्रामीण क्षेत्रातील ३६ व बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील २, बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ३२२ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरातील २२३ व ग्रामीण क्षेत्रातील ९९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात २,६७६ रुग्ण उपचाराधीन असून शहरातील २,१६३ व ग्रामीण क्षेत्रातील ५१३ रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here