आदर्श मंगल परिणय सोहळा संपन्न…

चिखली – घारोड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे मंगल परिणय सोहळा दरम्यान बहुजन महापुरुषांच्या विचारांची पुस्तके देऊन मान्यवरांचे स्वागत व कवी हि.रा.गवई सर यांच्या क्रांती फुले काव्य संग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.

घारोड येथील तेजराव इंगोले यांची कन्या स्वाती व विक्रम रामभाऊ गवई यांचा मुलगा विनय यांचा आदर्श विवाह मंगल परिणय सोहळा पार पडला. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रा. मंगेश खिल्लारे यांनी हा विवाह सोहळा कोरोणाचे सर्व नियम लक्षात घेऊन पार पाडला. वधू-वरांचे,पाहुण्यांचे व सर्व मान्यवरांचे स्वागत फुले- शाहू-आंबेडकरी विचारांची पुस्तके देऊन करण्यात आले.

मान्यवरांमध्ये आदर्श अर्बन बँकेचे अध्यक्ष मा.विलास भाडाईत साहेब, दै.देशोन्नतीचे पत्रकार ठाकरे साहेब, ताम्हणकर साहेब, प्रकल्प अधिकारी न.प. चिखलीचे सुभाष पाखरे साहेब,संतोष खरात माजी सरपंच, प्रशांतभैय्या डोंगरदिवे जिल्हाध्यक्ष मानवाधिकार,डॉ. प्रवीण सरदार,

मोरे साहेब सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक,वन अधिकारी कैलास वानखेडे,ए्ड मा. सागर गवई,मा.विलास तायडे या सर्वांचे शाल व क्रांती फुले काव्यसंग्रह भेट देऊन वरपिता विक्रम रामभाऊ गवई यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.शेवटी सर्व मान्यवरांचे आभार श्रीकांत गवई यांनी मानून विवाह सोहळा संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here