अभिनेत्री सनी लिओनीच नाव कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये…काय आहे प्रकरण ?

न्यूज डेस्क- बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच कुठल्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चर्चेत असते. यावेळी हे प्रकरण वेगळच आहे, कारण कोलकाताच्या एका महाविद्यालयाने प्रवेशासाठी जारी केलेल्या गुणवत्ता यादीमध्ये सनी लिओनीला प्रथम स्थान देण्यात आल्याने कॉलेज प्रशासनाची तारांबळ उडाली.

कोलकाता येथील एका कॉलेजने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं नाव टॉपर म्हणून घोषित केल्याचं समोर आलं आहे.

कोलकात्याच्या आशुतोष कॉलेजमध्ये हा विचित्र प्रकार घडलाय. कॉलेजने बीए ऑनर्स (BA Honours, English) प्रवेशासाठी जारी केलेल्या यादीत सनी लिओनीचं नाव सर्वात वरती होतं. ही यादी कॉलेजच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली होती.

“हे खोडकर काम आहे, कोणीतरी जाणूनबुजून सनी लिओनीच्या नावाने चुकीचा अर्ज पाठवला. आम्ही संबंधित विभागाला चूक सुधारण्यास सांगितले असून या घटनेची चौकशीही केली जाईल”, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

या घटनेने शिक्षणतज्ज्ञांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हेच महाविद्यालयीन अधिकारी सांगतात की ही कुणाची खोड आहे, कुणी मुद्दाम टाइप करुन ती पाठविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here